Home उतर महाराष्ट्र श्रीरामपूरला दिव्यांग मतदार जनजागृती अभियान

श्रीरामपूरला दिव्यांग मतदार जनजागृती अभियान

89
0

Yuva maratha news

1000313828.jpg

श्रीरामपूर : दिपक कदम तालुका प्रतिनिधी –महामानव भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त  दिव्यांग मतदार जनजागृती अभियान राबविण्याचा योगायोग नक्कीच भूषणावह आहे.कारण संविधानाच्या माध्यमातून महामानव बाबासाहेबांनी आपल्याला मतदानाचा अधिकार दिला.यु.एस.ए.व प्रगत देशांमध्ये फक्त पुरुषांनाच मतदानाचा अधिकार होता.महिलांना मतदानाचा अधिकार प्राप्त करण्यासाठी संघर्ष करावा लागला.आपल्याला तो अधिकार बाबासाहेबांमुळे प्राप्त झाला.त्या संधीचे सोने आंपण मतदान करून केले पाहिजे.
प्रत्येक मतदान केंद्रावर दिव्यांग व्यक्तींसाठी अडथळा विरहित सुविधा,व्हीलचेअर, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था व आवश्यक सुविधा देण्यात येणार आहे,दिव्यांग व्यक्ती करिता आशा वर्कर,एन.एस.एस.व एन.सी.सी.चे विद्यार्थी विशेष सहकार्य करणार आहे.जी दिव्यांग व्यक्ती मतदान केंद्रापर्यंत येऊ शकत नाही.त्यांचे फाॅर्म प्रत्येक विभागनिहाय मतदान केंद्रस्तरीय अधिकारी घरोघरी जाऊन नोंदणी करत आहेत.
13 मे रोजी प्रचंड उष्णता असणार आहे.त्यामुळे सकाळी आंपण मतदान प्रक्रिया पार पाडावी.अपंग सामाजिक विकास संस्था व आसान दिव्यांग संघटना यांचे प्रशासनास नेहमीच सहकार्य मिळत आहे.सदृढ व सक्षम लोकशाही करिता आंपण 100% मतदान करावे असे आवाहन तहसीलदार मिलिंद कुमार वाघ यांनी दिव्यांग मतदार जनजागृती व दिव्यांग कायदे प्रबोधन मेळावा उद्घाटनप्रसंगी केले.
अपंग सामाजिक विकास संस्था श्रीरामपूर व आसान दिव्यांग संघटना महाराष्ट्र यांच्या संयुक्त विद्यमाने सहर्षा हाॅल बोंबले पाटील नगर श्रीरामपूर येथे दिव्यांग मतदार जनजागृती अभियान व दिव्यांग कायदे प्रबोधन मेळावा आयोजित करण्यात आला होता.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विश्वलक्ष्मी ग्रामीण प्रतिष्ठानचे सचिव सुकदेव सुकळे होते.तर विश्वलक्ष्मी ग्रामीण प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष टी.ई. शेळके,जेष्ठ साहित्यिक प्रा.डॉ. बाबुराव उपाध्ये,स्वीप समन्वयक गणेश पिंगळे,अपंग सामाजिक विकास संस्थेचे चेअरमन संजय साळवे,सचिव वर्षा गायकवाड, तलाठी राजु घोरपडे, आरोग्य मित्र सुभाष गायकवाड, आसान दिव्यांग संघटनेचे प्रदेशाध्यक्ष मुश्ताकभाई तांबोळी, महिला प्रदेशाध्यक्ष स्नेहा कुलकर्णी,खजिनदार सौ.साधना चुडिवाल यांची प्रमुख उपस्थिती होती.
याप्रसंगी मतदान संदर्भात उपस्थित दिव्यांग व्यक्तींना तहसीलदार यांनी सामुहिक शपथ दिली.माजी प्राचार्य टी.ई.शेळके,डॉ बाबुराव उपाध्ये,सुभाष गायकवाड, सुकदेव सुकळे यांनी मनोगत व्यक्त करताना दिव्यांगाकरिता उपक्रमशील कार्यक्रमाचे विशेष कौतुक करून संयोजक संजय साळवे व वर्षा गायकवाड यांचा विश्वलक्ष्मी ग्रामीण प्रतिष्ठानच्या वतीने सन्मानचिन्ह व पुस्तके देऊन गौरविण्यात आले व शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमप्रसंगी रमजान ईद निमित्त ईद मिलाद कार्यक्रम देखील संपन्न झाला.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शशांक रासकर,इरफान शेख सर,अब्दुल पठाण,हाकिम, निवडणूक शाखेचे संदिप पाळंदे,सुधाकर बागुल, सौ.रजिया तांबोळी,कादिर शेख,गंगाधर सोमवंशी,कु.प्रज्ञा बागुल यांनी विशेष परिश्रम घेतले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजय साळवे यांनी केले तर आभार मुश्ताकभाई तांबोळी यांनी मानले

Previous articleआंबेडकर जयंतीनिमित्त दिपक कदम यांना पुरस्काराने सन्मानित…
Next articleसभेच्या मैदानावरून अमरावती बच्चू कडू आक्रमक, सभेच्या मैदानातच बच्चू कडू यांचा ठिय्या.
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here