Home Breaking News 🛑 कऱ्हाड,सांगली आणि कोल्हापूर प्रवास करीत असला…! तर हे वाचा 🛑 ✍️...

🛑 कऱ्हाड,सांगली आणि कोल्हापूर प्रवास करीत असला…! तर हे वाचा 🛑 ✍️ कऱ्हाड :( विजय पवार महाराष्ट्र प्रतिनिधी युवा मराठा न्युज )

119
0

🛑 कऱ्हाड,सांगली आणि कोल्हापूर प्रवास करीत असला…! तर हे वाचा 🛑
✍️ कऱ्हाड 🙁 विजय पवार महाराष्ट्र प्रतिनिधी युवा मराठा न्युज )

कऱ्हाडः⭕ शासनाने जिल्हाबंदी केली. मात्र, महत्त्वाच्या कामासाठी थेट ई-पासची सुविधा नागरिकांना करून दिलेली आहे. त्याचा लाभ घेऊन कोल्हापूर, सांगलीला जाणाऱ्या वाहनांची संख्या 300 इतकी आहे. त्या प्रत्येक मोठ्या वाहनात पाच, तर लहान वाहनात तीन असे सरासरीनुसार दोन हजार 400 नागरिक दररोज सांगली, कोल्हापूर प्रवास करत आहेत. म्हणजे तीन महिन्यांत दोन लाख नागरिकांनी प्रवास केला आहे. हा प्रवास कोरोना संसर्ग वाढण्यासाठी धोकादायक ठरतो आहे.

ई-पासद्वारे कोल्हापूर व सांगलीला विविध कामानिमित्त जाणाऱ्यांची संख्या वाढली आहे.

त्यासाठी मालखेड फाटा, किणी टोलनाका अशा दोन ठिकाणी तपासणी केली जाते. त्या संबंधितांची नोंद घेतली जाते. आला कधी गेला कधी, राहणार आहात काय, अशी चौकशी केली जाते. त्यानुसार त्या नोंदी होतात,

तसेच काहीवेळा गंभीर कारणे सांगून विनाकारण कोल्हापूर, सांगलीचा प्रवास करणाऱ्यांची संख्याही वाढले आहे. तो प्रवास नागरिकांच्या मुळावर येऊ लागला आहे. प्रवासात बाधितांच्या संपर्कात आल्याने कोरोनाबाधित होणाऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. शहरात बाधित सापडले आहेत. त्यांना सांगली, कोल्हापूरच्या प्रवासाची हिस्ट्री आहे. त्यामुळे सापडलेल्या बाधिंताना रोजचा प्रवास कोरोनाबाधित होण्यास कारणीभूत ठरताना दिसत आहे. त्यामुळे आता या अधिकृत ई-पासद्वारे होणाऱ्या प्रवासावर निर्बंध लावायचा कसा, याचे आव्हान शासनासमोर आहे.

कोल्हापूर ;⭕ त्या डाॅक्टरांचा कोरोना अहवाल येताच संपर्कातील लोकांचा शोध सुरू
पोलिसांकडून ई-पासद्वारे प्रवास करणाऱ्या वाहनांची नोंद केली जाते. त्यानुसार सांगली व कोल्हापूरला प्रवास करणाऱ्या दररोज सुमारे 300 वाहनांची, तर सुटीच्या दिवशी 500 वाहनांची नोंद होते. त्यात सरासरी तीन प्रवाशी घेऊन जाणाऱ्या कारची संख्या तुलनेत जास्त आहे. दररोज 300 वाहने ये- जा करत असतील तर तीन महिन्यांत तब्बल नऊ हजार वाहनांनी ये-जा केली आहे. तब्बल दोन लाख दहा हजार नागरिकांचा प्रवास झाला आहे. तो प्रवास नागरिकांच्या जिवावर बेतण्याची शक्‍यता आहे. प्रवास केल्याने कोरोना होत आहे, त्यामुळे प्रवास टाळण्याची गरज असताना प्रवास करणाऱ्यांची संख्या वाढतेच आहे.

ई-पासद्वारे शासनाने प्रवासाला परवानगी दिलेली आहे. कारणाशिवाय प्रवास करणे योग्य नाही. जास्त प्रवास केल्यामुळे कोरोनाची बाधा होऊ शकते. अलीकडच्या काळात प्रवासामुळे कोरोनाबाधित झालेल्यांची संख्या पाहता नागरिकांनी प्रवास टाळण्याची गरज आहे.

– सूरज गुरव, पोलिस उपअधीक्षक, कऱ्हाड

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here