Home Breaking News 🛑 मुंबई विद्यापीठात कोरोनाचा शिरकाव, विद्यापीठाच्या दोन्ही कॅम्पसमध्ये 8 जण कोरोना पॉझिटिव्ह...

🛑 मुंबई विद्यापीठात कोरोनाचा शिरकाव, विद्यापीठाच्या दोन्ही कॅम्पसमध्ये 8 जण कोरोना पॉझिटिव्ह 🛑 मुंबई ( साईप्रजित मोरे ब्युरो चीफ युवा मराठा न्युज )

98
0

🛑 मुंबई विद्यापीठात कोरोनाचा शिरकाव, विद्यापीठाच्या दोन्ही कॅम्पसमध्ये 8 जण कोरोना पॉझिटिव्ह 🛑
मुंबई ( साईप्रजित मोरे ब्युरो चीफ युवा मराठा न्युज )

मुंबई, 16 जुलै : ⭕ मुंबई विद्यापीठात मागील महिन्याभरापासून कामकाज सुरू आहे. मुंबई, ठाणे, कल्याण, नवी मुंबई या भागातून कर्मचारी विद्यापीठात कामाला येतात त्यात मागील दोन आठवड्यापासून हा कोरोनाचा संसर्ग कर्मचाऱ्यांमध्ये वाढत असल्याची माहिती आहे.

मुंबई विद्यापीठ फोर्ट कॅम्पस आणि कलिना कॅम्पसमध्ये काम करणारे असे एकूण 8 जण कोरोना बाधित मिळाले असून त्यांच्या संपर्कात असलेले 60 ते 70 कर्मचाऱ्यांना स्वतः च्या घरी क्वांरटाइन होण्यास सांगितले आहे. हे कोरोना बाधित कर्मचारी मुंबई विद्यापीठाच्या विविध विभागाचे असून ज्या ठिकणी कोरोनाचा संसर्ग झाला त्या ठिकाणचे विभाग बंद ठेवून त्या विभागात निर्जंतुकीकरण करण्याचे काम केले जात आहे.

मुंबई विद्यापीठात मागील महिन्याभरापासून कामकाज सुरू आहे. मुंबई, ठाणे, कल्याण, नवी मुंबई या भागातून कर्मचारी विद्यापीठात कामाला येतात त्यात मागील दोन आठवड्यापासून हा कोरोनाचा संसर्ग कर्मचाऱ्यांमध्ये वाढत असल्याची माहिती आहे. जे कर्मचारी कोरोना बधितांच्या संपर्कात आढळले आहेत असे कर्मचारी स्वतःच्या घरी क्वांरटाइन राहिलाय सांगितलं शिवाय लक्षण आढळल्यास त्यांची कोरोना चाचणी करण्यात येणार आहे. मुंबई विद्यापीठत काम करण्यासाठी शासनाने घालून दिलेल्या अटी नियमानुसार 10 ते 15 टक्के कर्मचारी रोज उपस्थित राहून काम करताय त्यात कोरोनाचा शिरकाव झाल्यास समोर आलंय.

यामध्ये मुंबई विद्यापीठ कलिना परीक्षा व मूल्यमापन विभागातील वरिष्ठ लिपिक, शिपाई, फोर्टच्या विधी विभागातील वरिष्ठ लघु लेखिका, हवालदार आणि लेखापाल, ग्रंथालय शिपाई, कनिष्ठ लिपिक कर्मचारी कोरोना बाधित झाले असून त्यांच्या सहवासात आलेले 60ते 70 कर्मचारी सध्या घरीच क्वांरटाइन आहेत. आता यामध्ये अस्थायी कर्मचाऱ्यांना विमा संरक्षण देण्याची मागणी करण्यात येत आहे. कारण अगदी तुटपुंज्या पगारावर काम करत कुटूंबाचा उदरनिर्वाह करत असताना आता कोरोना संसर्ग झाल्यानंतर होणारा खर्च करणे हा अस्थायी कर्मचाऱ्यांना कठीण झालं असून कोरोना बधितांचा रुग्णलयाच्या खर्च विद्यापीठ प्रशासनाने करावा अशी मागणी अस्थायी कर्मचाऱ्यांकडून करण्यात आलीये. शिवाय, विद्यापीठात कोरोनाचा वाढत असलेला धोका पाहून अस्थायी कर्मचारी वर्गाला आर्थिक त्रास होणार नाही यासाठी तात्काळ विमा संरक्षण देण्यात यावे अशी मागणी विद्यापीठातील कामगार संघटनेचे अध्यक्ष मिलिंद तुळसकर यांनी केली आहे.⭕

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here