• Home
  • 🛑 जिओने सादर केला जादूचा चश्मा! JioGlass वापरून मिळणार थेट भेटीचा 3D अनुभव 🛑 मुंबई ( साईप्रजित मोरे ब्युरो चीफ युवा मराठा न्युज )

🛑 जिओने सादर केला जादूचा चश्मा! JioGlass वापरून मिळणार थेट भेटीचा 3D अनुभव 🛑 मुंबई ( साईप्रजित मोरे ब्युरो चीफ युवा मराठा न्युज )

🛑 जिओने सादर केला जादूचा चश्मा! JioGlass वापरून मिळणार थेट भेटीचा 3D अनुभव 🛑
मुंबई ( साईप्रजित मोरे ब्युरो चीफ युवा मराठा न्युज )

मुंबई, 16 जुलै : ⭕ रिलायन्स समुहाची 43वी एजीएम सध्या सुरू आहे. रिलायन्स समुहाचे चेअरमन मुकेश अंबानी (RIL Chairman Mukesh Ambani) यांनी जिओ 5G रोडमॅपचे अनावरण केले. हा रोडमॅपचे पूर्णपणे भारतामध्ये विकसीत करण्यात आले आहेत. जिओ 5Gची ही सेवेचे 2021 मध्ये ग्राहकांसाठी प्रीमियर करण्यात येईल. दरम्यान 5G बरोबर जिओनं स्मार्ट ग्लास नावाचा एक चश्माही लॉंच केला आहे. मुख्य म्हणजे या चश्म्याच्या मदतीनं तुम्हाला 3D भेटीचा अनुभव घेता येणार आहे.

या चश्म्याला JioGlass असे नाव देण्यात आले आहे. यात स्पीकर आणि माइक दोघांचा सपोर्ट देण्यात आला आहे. या स्मार्ट ग्लासच्या मदतीने व्हिडीओ कॉलिंगचाही लाभ घेता येणार आहे. भारतात आतापर्यंत ही भन्नाट सेवा देणारी जिओ पहिली कंपनी आहे. या ग्लासचे आज अनावरण करण्यात आले.

आज अनावरण करण्यात आलेल्या या जिओ ग्लासचे वजन 75 ग्रॅम असेल. हा एक व्हर्च्युअल रिअॅलिटीचा अनुभव देणारा चश्मा आहे. या चश्माला कनेक्ट करण्यासाठी एकच केबल आहे. आधीपासूनच यात 25 अ‍ॅप्स आहेत जे व्हिडीओ मीटिंग्ससाठी उपयोगी ठरतात. जिओ ग्लास एक केबलसह आला आहे जो आपण आपल्या स्मार्टफोनशी कनेक्ट करू शकता. जिओ ग्लास 3D मीटिंग्ज आणि व्हिडिओ कॉलसाठी वापरला जाऊ शकतो. युझर जियो ग्लाससह व्हर्च्युअल स्क्रीनमध्ये सादरीकरणे करू शकता.

जिओ 5Gची ही सेवेचे 2021 मध्ये ग्राहकांसाठी प्रीमियर करण्यात येईल. 2021 पासून ग्राहकांसाठी ही सेवा उपलब्ध होईल, दरम्यान इतर देशांमध्येही ही सेवा सुरू करण्यात येणार आहे. ‘भारतामध्ये पूर्णपणे विकसीत करण्यात आलेल्या सुविधा जागतिक स्तरावर पोहोचवण्याची वेळ आता आली आहे’, अशी घोषणा रिलायन्सचे चेअरमन मुकेश अंबानी यांनी केली.जिओ प्लॅटफॉर्म ‘आत्मनिर्भर भारत’साठीचे महत्त्वाचे उदाहरण ठरेल अशी घोषणा यावेळी अंबानी यांनी केली.⭕

anews Banner

Leave A Comment