Home बुलढाणा बिबी गावातील देशी दारू दुकान बंद करण्यासाठी महिलांचा चालू आहे बैठा सत्याग्रह

बिबी गावातील देशी दारू दुकान बंद करण्यासाठी महिलांचा चालू आहे बैठा सत्याग्रह

62
0

आशाताई बच्छाव

IMG-20220621-WA0055.jpg

बिबी गावातील देशी दारू दुकान बंद करण्यासाठी महिलांचा चालू आहे बैठा सत्याग्रह

ज्ञानेश्वर पाटील दांदळे
युवा मराठा न्यूज विशेष प्रतिनिधी

लोनार:- तालुक्यातील बीबी गावातील दारूच्या दुकानासमोर महिलांचा सुरू आहे “बैठा सत्याग्रह” चंद्रपूर जिल्ह्यातील नाकोडा गावातुन बुलडाणा जिल्ह्यातील लोणार तालुक्यातील बिबी या गावात देशी दारूचे दुकान स्थलांतर करण्यासाठी बीबी ग्रामपंचायतमध्ये घेण्यात आलेल्या ठरावाची चौकशी होईपर्यंत घेतलेल्या ठरावाची अंमलबजावणी करण्यात येऊ नये, म्हणजे ठरावाने सुरू असलेल्या देशी दारूचे दुकान चौकशी होईपर्यंत बंद ठेवावे अशा अमरावतीच्या विभागीय आयुक्तांकडून देण्यात आलेल्या आदेशाकडे लक्ष वेधण्यासाठी गावातीलच सौ सुनीता भांड यांच्यासह इतर महिला गावातील महिलानी बोगस ठरावाने सुरू असलेल्या देशी दुकानासमोर सत्याग्रह आंदोलन सुरू केले आहे. विशेष म्हणजे एक दिवस अगोदर सौ सुनीता भांड यांनी अंगावर पेट्रोल घेवून आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला होता, मात्र वेळीच पोलीस, ग्रामसेवक व इतर विभागाच्या कर्मचाऱ्यांनी सौ सुनीता भांड यांना आत्मदहन करण्यापासून रोखले त्यामुळे मोठी दुर्घटना टळली.
दरम्यान जोपर्यंत देशीदारू दुकान बंद केल्या जाणार नाही तोपर्यंत आम्ही उठणार नाही अशी भूमिका घेतल्याने जिल्हा प्रशासनात खळबळ उडाली आहे.
बीबी ग्रामपंचायत मध्ये तत्कालीन सरपंच यांनी 20 डिसेंबर 2018 रोजी चंद्रपूर जिल्ह्यातील नाकोडा गावातील देशी दारूचे दुकान स्थलांतर करण्यासाठी ठराव घेण्यात आला होता. सदर ठराव नियमबाह्य बोगस पद्धतीने घेतले असा आरोप करून पुराव्यानिशी बीबी गावातील सामाजिक महिला कार्यकर्त्या सौ सुनीता भांड यांनी जिल्हा परिषद यांच्याकडे तक्रार दाखल करून ठराव रद्द करून हायवेवर सुरू करण्यात आलेल्या देशी दारूची दुकान बंद करण्याची मागणी केली होती. यासाठी त्यांनी आंदोलन, उपोषण देखील केली होती. मात्र जिल्हा परिषदेकडून काहीच कारवाई होत नसल्याने 20 डिसेंबर 2018 रोजी ग्रामपंचायतकडून घेण्यात आलेला नियमबाह्य बोगस ठराव रद्द करण्यासाठी अमरावती विभागीय आयुक्त यांच्याकडे दाद मागितली होती. यावर विभागीय आयुक्त पियुष सिंह यांनी 20 मे 2022 रोजी आदेश पारित करून जिल्हा परिषदेच्या मुख्यकार्यकारी अधिकारी यांनी घेतलेल्या ठरावाची अधिनस्त यंत्रणेमार्फत चौकशी करावी. व चौकशी होईपर्यंत 20 डिसेंबर 2018 रोजी घेण्यात आलेल्या ठरावाची अंमलबजावणी करण्यात येऊ नये असे बुलडाणा जिल्हा प्रशासनाला आदेशीत केले, मात्र जिल्हा प्रशासनाने विभागीय आयुक्तांच्या आदेशाला केराची टोपली दाखवली व तरीही देशी दारूचे दुकान सुरू आहे.
या विरोधात तक्रार कर्त्या महिलांनी पुन्हा बंड पुकारले व आत्मदाहनाचा इशारा दिला होता. त्यानुसार शुक्रवारी देशी दारू दुकानासमोर अंगावर पेट्रोल घेऊन आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला मात्र वेळीच पोलीस, ग्रामसेवक व इतर विभागाच्या कर्मचाऱ्यांनी सौ सुनीता भांड यांना आत्मदहन करण्यापासून रोखले त्यामुळे मोठी दुर्घटना टळली. मात्र आता या महिलांनी जिल्हा प्रशासनाने लक्ष वेधण्यासाठी चक्क देशी दारू दुकानासमोरच ठिय्या देत बैठा सत्याग्रह सुरू केला आहे.

Previous articleभोकर तालुक्यातील पाळज शिवारात वीज पडून तीन शेत मजुराचा मृत्यू परिसरात सर्वत्र हळहळ.
Next articleमंत्री एकनाथ शिंदे प्रचंड नाराज ..? शिवसेना गॅसवर..सरकार जाणार की राहणार…?
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here