Home नांदेड भोकर तालुक्यातील पाळज शिवारात वीज पडून तीन शेत मजुराचा मृत्यू परिसरात सर्वत्र...

भोकर तालुक्यातील पाळज शिवारात वीज पडून तीन शेत मजुराचा मृत्यू परिसरात सर्वत्र हळहळ.

154

आशाताई बच्छाव

IMG-20220621-WA0056.jpg

भोकर तालुक्यातील पाळज शिवारात वीज पडून तीन शेत मजुराचा मृत्यू परिसरात सर्वत्र हळहळ.
नांदेड जिल्हा ब्युरो चीफ मनोज बिरादार (युवा मराठा न्यूज नेटवर्क)
भोकर तालुक्यातील पाळज येथे अचानक आलेल्या वादळी वारे आणि विजांच्या कडकडाटासह पाळज शिवारात मंगळवारी दुपारी चार ते पाच वाजेच्या दरम्यान पाऊस सुरू झाला होता. यात पाळज शिवारात गावातील मजूर सोयाबीन पेरणी चे काम करीत असताना अचानक विजेच्या कडकडाटासह पाण्याचे सरी येत असल्याने पाण्यापासून आपले संरक्षण करण्यासाठी या तीनही शेतमजुरांनी शेतातील झाडाचा आसरा घेतला. परंतु त्यातच काम करणाऱ्या मजुरावर काळाने घाला घातला. वीज पडून तीनही मजूर जागच्या जागी ठार झाले. भोकर तालुक्यातील पाळज येथील रहिवासी साईनाथ सातमवार वय ३० वर्ष, राजेश चटलावार वय ४० वर्ष, बोजन्ना रामनवार वय ३२ वर्षे असे तीन शेत मजूर जागीच ठार झाले. घटनेची माहिती मिळताच भोकर चे तहसीलदार राजेश लांडगे व त्यांचे पथक पोलीस निरीक्षक विकास पाटील व त्यांची टीम यासह गावातील पोलीस पाटील सरपंच, शेतकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. सध्या तिन्ही मृतदेह पोलिसांनी ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी भोकर रुग्णालयात पाठविले आहे. या तीनही शेतमजुरावर वीज पडल्याने गावावर शोककळा पसरली आहे.

Previous articleविधान परिषद रणनीती जल्लोष अतिषबाजीसह उत्साहात साजरा
Next articleबिबी गावातील देशी दारू दुकान बंद करण्यासाठी महिलांचा चालू आहे बैठा सत्याग्रह
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.