Home मुंबई मंत्री एकनाथ शिंदे प्रचंड नाराज ..? शिवसेना गॅसवर..सरकार जाणार की राहणार…?

मंत्री एकनाथ शिंदे प्रचंड नाराज ..? शिवसेना गॅसवर..सरकार जाणार की राहणार…?

58
0

आशाताई बच्छाव

IMG-20220621-WA0057.jpg

मंत्री एकनाथ शिंदे प्रचंड नाराज ..? शिवसेना गॅसवर..सरकार जाणार की राहणार…?

मुंबई (अंकुश पवार, जिल्हा प्रतिनिधी, युवा मराठा वेब न्यूज चॅनल अँड पेपर)

मुंबईमध्ये शिवसेनेचा अधिराज्य अनेक वर्षांपासून आपल्याला पाहायला मिळते परंतु याच शिवसेनेत आता बंडखोरीची कीड लागल्याचे दिसून येत आहे. तसेच शिवसेनेला बंडखोरी ही काही नवीन नाही हिंदुरुदय सम्राट बाळासाहेब ठाकरे असताना देखील अनेक नेते आणि अनेक कार्यकर्ते नाराज होते ते पक्ष सोडून गेले परंतु एवढी चर्चा आणि एवढी भावनिक चर्चा तेव्हा होताना दिसली नाही परंतु आता शिंदे यांच्या बाबतीत होताना दिसून येत आहे याचे कारण आहे सहाजिक आहे कारण शिवसेना म्हटली की शिवसेनेचा निर्माण हे जरी मातोश्री शिवसेना भवन आणि मुंबई या तीन त्रिकोणाचे असले तरीसुद्धा शिवसेनेच्या उगमाचे मूळ आणि नावलौकिक याचे मूळ लेख ठाण्यातूनच आहे जे आनंद दिघे साहेब यांच्या रुपाने दशकात पाहायला मिळाली होती आणि आता आनंद दिघे साहेब यांच्या मृत्यूनंतर 22 वर्षांनंतर पुन्हा बंडखोरीचा आणि त्यात संकटाचा सामना आदर्श शिवसैनिक आणि शिवसेनेला करावा लागणार आहे एकनाथ शिंदे यांच्या यांच्या नावाची मुळे परंतु ही नाराजी कशासाठी तर सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या काही प्रमुख मागण्या आहेत ते म्हणजे भाजपासोबत पक्षहितासाठी युती करावी किंवा सरकार बनवावे कारण बाळासाहेब यांच्या विचारांना धरून किंवा बाळासाहेबांच्या इच्छेविरुद्ध सरकारी निर्माण केले अशी विभागाची ओळख गेल्या विधानसभा पासून सुरू होती आणि इतके वर्ष राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस सोबत कधीही न पटणारी शिवसेना आता सत्तेत बसू लागली.
शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे संपर्काच्या बाहेर आहेत. त्यामुळे राज्यात राजकीय भूकंप होणार असल्याच्या चर्चेला उधाण आलंय. हे काही नाराजीचे कारण असू शकत नाही कारण ह्या चर्चा आणि ठिकाण आणि दिवसापासून पाहत आहोत परंतु मानापमान त्यानंतर आत्ताच विधानपरिषद राज्यसभेचे झालेल्या निवडणुका त्यात आलेल्या जाती तसेच अनेक वयाने लहान असताना देखील अनेक अधिकार काही लोकांना दिलेली असल्यामुळे पक्षात होणारी गोची या काही नाराजगी च्या अटी किंवा नाराजगी शिंदे साहेबांची झाली असावी असे मत व्यक्त करायचा आहे परंतु शिंदे साहेब नाराज होईल इतके कमकुवत किंवा नागरी दाखवण्यासाठी नेते नाहीत ते आनंद दिघे यांच्या तालमीत आणि शिकवणीवर तयार झालेले आहे परंतु त्यांच्या या अडचणीत त्यांच्या आमदार जी साथ दिली आहे.
राज्यसभेनंतर विधान परिषद निवडणुकीतही भाजपाने महाविकास आघाडीला धक्का दिला. यानंतर राज्यातील महाविकासआघाडीचं सरकार धोक्यात येणार असे अनेक दावेही करण्यात येत आहेत. अशातच शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे संपर्काच्या बाहेर आहेत. त्यामुळे राज्यात राजकीय भूकंप होणार असल्याच्या चर्चेला उधाण आलंय. शिवसेनेकडून वारंवार एकनाथ शिंदेंसोबत संपर्क साधण्याचा प्रयत्न केला जात आहे. दरम्यान एकनाथ शिंदे गुजरातमधील सूरतमध्ये असून त्यांच्यासोबत १२ पेक्षा अधिक आमदार असल्याचं सांगितलं जात आहे. शिवसेनेचे रायगडमधील तिन्ही आमदारही संपर्क क्षेत्राबाहेर असून ते एकनाथ शिंदेंसोबत असण्याची शक्यता व्यक्त होत आहे. एकनाथ शिंदे संपर्काबाहेर असल्याने त्यांनी बंड पुकारल्याचे तर्कवितर्क लावले जात आहेत.

Previous articleबिबी गावातील देशी दारू दुकान बंद करण्यासाठी महिलांचा चालू आहे बैठा सत्याग्रह
Next articleबल्‍लारपूर विधानसभा क्षेत्रातील समस्‍यांचे त्‍वरीत निराकरण करा – आ. सुधीर मुनगंटीवार
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here