Home नांदेड गणेश मंडळातर्फे कमळेवाडीत आरोग्य शिबिर संपन्न.

गणेश मंडळातर्फे कमळेवाडीत आरोग्य शिबिर संपन्न.

51
0

आशाताई बच्छाव

IMG-20220903-WA0039.jpg

गणेश मंडळातर्फे कमळेवाडीत आरोग्य शिबिर संपन्न.

नांदेड जिल्हा ब्युरो चीफ मनोज बिरादार (युवा मराठा न्यूज नेटवर्क)

मुखेड तालुक्यातील कमळेवाडी येथील सार्वजनिक ग्रामदैवत गणेश मंडळातर्फे गावातील व परिसरातील नागरिकांचे आरोग्य तपासणी शिबिर घेण्यात आले व या शिबिरास जनतेतून चांगला प्रतिसाद मिळाला.
सध्या निसर्गाच्या लहरीपणामुळे वातावरणात बदल झाल्याने कधी ढगाळ तर कधी कडक ऊन अशा प्रकारामुळे पर्यावरणात मोठा बदल होऊन सामान्य नागरिकांचे जनजीवन विस्कळीत होऊन नागरिक मोठ्या प्रमाणात थंडी, ताप, डोकेदुखी, सर्दी अशा एक ना अनेक आजाराने नागरिक हैराण झाले आहेत व शहरातील सर्वच्या सर्व दवाखाने हाउसफुल झाले, ही परिस्थिती पाहून ग्रामदैवत गणेश मंडळातर्फे नागरिकांची आरोग्य तपासणी करावयाचे ठरवले त्यामुळे माहिती कळताच ग्रामस्थांमध्ये नवचैतन्य निर्माण होऊन ते आनंदी दिसत होते कमळेवाडी येथे मुखेड तालुक्याचे आरोग्य अधिकारी डॉ. रमेश गवाले यांच्या आदेशानुसार व प्रा.आ. केंद्र सावरगाव पि. येथील डॉ. बालाजी गरुडकर यांच्या मार्गदर्शनाखाली सावरगाव पीर येथील आरोग्य टीमने कांबळेवाडी येथे येऊन गावातील व परिसरातील ग्रामस्थांचे संपूर्ण आरोग्य तपासणी व उपचार करून औषध गोळ्या देण्यात आले यामध्ये बीपी, शुगर, कुष्ठरोग तपासणी, रक्ताच्या तपासणी त्यासोबत संपूर्ण किरकोळ आजारावर तपासणी करून उपचारासाठी औषधी गोळ्या देण्यात आले यावेळी डॉ. किरण ठाकरे, डॉ. सचिन मोरे, फार्मासिस्ट मजरुद्दीन शेख,(आ.स.) एम के वाघमारे,लॅब टेक्निशियन कल्लाळे,(आ.से.) शिवकुमार चोंडीकर, आरोग्यसेविकेत जाधव जी.आर., सोनटक्के वंदना, जया पिल्लेवार, सविता जाधव, संगीता चटलावर, व अंगणवाडी सेविका संगीता देवकत्ते तर (वा.चा.) जयदीप राठोड इत्यादी आरोग्य टीमने काम पाहिले यावेळी शिबिरास प्रमुख पाहुणे म्हणून जि.प. सदस्य संतोष राठोड तर भास्कर पवार पत्रकार हे उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी गणेश मंडळाचे अध्यक्ष बाळकृष्णा राठोड,उपाध्यक्ष व्यंकट पाटील, सदस्य भुजंग श्रीरामे,पंकज पुटवाड, विठ्ठल देवकते, माधव श्रीरामे, तसेच गावातील सरपंच प्र. सुनील राठोड उपसरपंच माधव श्रीरामे तर सदस्य विश्वंभर श्रीरामे गावातील इतर प्रतिष्ठित नागरिक गावातील व परिसरातील असंख्य नागरिक यावेळी या शिबिराचा लाभ घेण्यासाठी उपस्थित होते.
शिबिराचा लाभ घेणारे शेकडो ग्रामस्थ हे आपली आरोग्य तपासणी झाली व उपचारा दरम्यान औषध गोळ्या पण मिळाल्याने ग्रामस्थांमध्ये एक आनंदाचे वातावरण तयार झाले होते कारण सध्या शेतकरी हा संकटात सापडला असल्यामुळे आणि आता ह्या व्हायरसने डोकेदुखी केल्याने त्यांना हजारो रुपये खर्च करून दवाखान्यात दाखवणे परवडणारे नसल्याने हा शिबिर म्हणजे त्यांना एक प्रकारे आधारच मिळाला असे त्यांनी स्वतः सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here