Home गडचिरोली भाजपा स्थापना दिनानिमित्त पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आपल्या घरावर भाजपाचा झेंडा लावावा आमदार...

भाजपा स्थापना दिनानिमित्त पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आपल्या घरावर भाजपाचा झेंडा लावावा आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांचे आवाहन

74
0

राजेंद्र पाटील राऊत

IMG-20220405-WA0117.jpg

भाजपा स्थापना दिनानिमित्त पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आपल्या घरावर भाजपाचा झेंडा लावावा

आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांचे आवाहन

६ एप्रिल भारतीय जनता पार्टीचा स्थापना दिवस म्हणून सर्वत्र साजरा होणार

गडचिरोली ,( सुरज गुंडमवार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क)

६ एप्रिल हा दिवस भारतीय जनता पार्टीचा स्थापना दिवस असून या स्थापना दिनानिमित्त भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यानीं व पदाधिकाऱ्यांनी आपल्या घरावर भारतीय जनता पार्टीचा ध्वज लावावा असे आवाहन गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांनी भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांना केले आहे.

भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांच्या श्रमाच्या आधारावरच आज भारतीय जनता पार्टीला सोनेरी दिवस आले असून भाजपाची देशात व देशातील अनेक राज्यात सत्ता आहेत. आज केवळ भारतातच नाही तर जगात सर्वाधिक मोठा राजकीय पक्ष म्हणून भारतीय जनता पार्टीची ओळख निर्माण झाली आहे. या पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते म्हणुन आपणाला अभिमान आहे. अशा आपल्या पार्टीचा ६ एप्रिल हा स्थापना दिवस असून आपण सर्व कार्यकर्त्यांनी आपापल्या घरावर भारतीय जनता पार्टीचा झेंडा लावावा असे आवाहन गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉ देवरावजी होळी यांनी केले आहे.

Previous articleनविन रेशनकार्ड धारक अन्नधाण्यापासुन वंचित।
Next articleON THE SPOT ….. पातूरच्या गिन्न्यांची गोष्ट
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here