Home गडचिरोली नविन रेशनकार्ड धारक अन्नधाण्यापासुन वंचित।

नविन रेशनकार्ड धारक अन्नधाण्यापासुन वंचित।

62
0

राजेंद्र पाटील राऊत

IMG-20220405-WA0121.jpg

नविन रेशनकार्ड धारक अन्नधाण्यापासुन वंचित।
गडचिरोली:(सुरज गुंडमवार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क)- शासनाकडून देण्यात येणार्या अन्नधाण्यापासुन नविन राशन कार्ड धारकांना वंचित राहावे लागत आहे.त्यामुळे नविन राशनकार्ड धारकांना अन्न व पुरवठा योजनेत समाविष्ट करण्याची मागणी देसाइगंज तालुक्यातील नव्याने तयार केलेल्या राशनकार्ड धारकांनी केली आहे.यासंदर्भातील निवेदन संतोष महले यांच्यामार्फतीने राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंञी ना.छगन भुजबळ यांना पाठविण्यात आले आहे.निवेदणात मटले आहे की,देसाइगंज तालुक्यातील अनेक नागरिंकांची परिस्थिती हातावर आणुन पानावर खाणार्यापैकी आहे.मोलमजुरिच्या भरोसावर संसाराचा गाडा हाकतांना शासकीय स्तरावरुन विविध योजनांच्या माध्यमातुन देण्यात येत असलेले राशन अनेकांनसाठी जगण्याचे आधार स्तंभ आहे.मागील तीन चार वर्षापासुन नविन राशनकार्ड धारकांचा अन्नधान पुरवठा योजणेत समावेश न करण्यात आल्याने संबधित कार्ड धारक मिळनार्या राशन च्या लाभापासुन वंचित आहेत.दरम्यान मागील तीन चार वर्षा पासुन तहसिल कार्यालयावर दरोज जकरा मारत असुन याबाबत संबधित अधिकार्याकडे विचारणा केली असता शासणाकडुन तसे आदेश प्राप्त नसल्याने सदर योजणेत नविन कार्ड धारकांचे नावे समाविष्ट करु शकत नसल्याचे सांगण्यात येत आहे.यामुळे अनेकांना विविध अडचणीचा सामना करावा लागत आहे.राशनकार्ड धारकांवर होत असलेला अन्याय दुर करण्यासाठी नविन राशनकार्ड धारकांचा अन्नधान पुरवठा योजणेत समावेश करावा.अशी मागणी निवेदनातुन करण्यात आली आहे.यावेळी देसाइगंज पंसचे माजी.सभापती गणेश ढवळे,लिलाधर मरें,महादेव लेनगुरे,ज्ञानेश्वर कवासे यांच्यासह राशनकार्ड धारक उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here