Home गडचिरोली जिल्हा सामान्य रुग्णालय गडचिरोली येथे होणार नवीन कार्डियाक कॅथलॅब आमदार डॉक्टर देवरावजी...

जिल्हा सामान्य रुग्णालय गडचिरोली येथे होणार नवीन कार्डियाक कॅथलॅब आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांच्या प्रयत्नाना यश

67
0

राजेंद्र पाटील राऊत

IMG-20220405-WA0117.jpg

जिल्हा सामान्य रुग्णालय गडचिरोली येथे होणार नवीन कार्डियाक कॅथलॅब

आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांच्या प्रयत्नाना यश

अर्थसंकल्पात १.५ कोटी रुपये मंजूर

आता गडचिरोलीतच होणार हृदय रोग तपासणी व रुग्णांवर उपचार

गडचिरोली,(सुरज गुंडमवार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क)

आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांच्या प्रयत्नातून गडचिरोली जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये कार्डियाक कॅथलॅब करिता १५० लक्ष रुपयाची तरतूद राज्याच्या अर्थसंकल्पात करण्यात आल्याने लवकरच गडचिरोली जिल्ह्यातील नागरिकांना जिल्ह्यातच हृदयाशी संबंधित आजारावर उपचार होणार आहेत .करिता आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांचे सर्वत्र अभिनंदन करण्यात येत आहे.

गडचिरोली जिल्ह्यातील सर्वसामान्य नागरिकांना आपल्या हृदयाशी संबंधित उपचाराकरिता नेहमीच नागपूर – चंद्रपूर येथे जावे लागते. त्याकरिता त्यांना मोठा आर्थिक भुर्दंडही सहन करावा लागतो. परंतु आता यासंबंधीत तपासणी व उपचार गडचिरोली येथील जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये मिळणार असल्याने येथील रुग्णांना त्याचा मोठा लाभ होणार आहे. आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांनी केलेल्या प्रयत्नांबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन करण्यात येत आहे.

Previous articleविकासासाठी वेगळ्या विदर्भ राज्याची निर्मिती करा खास.अशोक नेते यांनी लोकसभेत मांडला अशासकीय ठराव
Next articleनविन रेशनकार्ड धारक अन्नधाण्यापासुन वंचित।
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here