Home सामाजिक देवीमळा (कौ) येथे छत्रपती शिवाजी महाराज जयंती संपन्न आश्रयआशा फाऊंडेशन कडून शालेय...

देवीमळा (कौ) येथे छत्रपती शिवाजी महाराज जयंती संपन्न आश्रयआशा फाऊंडेशन कडून शालेय साहित्य  वाटप       

318

राजेंद्र पाटील राऊत

देवीमळा (कौ) येथे छत्रपती शिवाजी महाराज जयंती संपन्न
आश्रयआशा फाऊंडेशन कडून शालेय साहित्य  वाटप         सोनज,(युवा मराठा न्युज प्रतिनिधी)-
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा देवीमळा येथे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.
या निमित्ताने शाळेमध्ये विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले.
याप्रसंगी शिवव्याख्याते श्री. सचिन मोरे सर यांचे व्याख्यान आयोजन करण्यात आले होते. तसेच आश्रयआशा फाउंडेशन या संस्थेमार्फत संस्थेचे अध्यक्ष तथा युवा मराठा न्यूजचे संपादक राजेंद्र पाटील राऊत यांच्यातर्फे शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करुन युवा मराठा शिवजयंती विशेषांक प्रकाशन देखील करण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ नागरिक जगन्नाथ पंडित बच्छाव गुरुजी हे होते. तर कार्यक्रमास पं.स.सदस्य गणेश खैरनार, व-हाणेचे किसन रुंझा पवार, आश्रयआशा फाऊंडेशनचे उपाध्यक्ष राजेंद्र तुकाराम पवार, सचिव श्रीमती आशाताई बच्छाव, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष पंढरीनाथ अहिरे, शिवजन्म उत्सवाचे प्रमुख जिभाऊ देवरे, जितु दादा खैरनार, अमोल दुकळे, नामदेव बोरसे, अशोक कदम, पुंजाराम कदम, विश्वास खैरनार, समाधान सूर्यवंशी, तुषार सूर्यवंशी,चंदुलाल वाघ, राजेंद्र बच्छाव, सचिन खैरनार, राजेंद्र खैरनार, ऋषिकेश खैरनार, गौरव खैरनार, आश्रयआशा फाऊंडेशनचे संचालक रविंद्र बोरसे, संदीप धोंडगे, शाळेतील माजी विद्यार्थी तसेच परिसरातील पालक बहुसंख्येने उपस्थित होते
कार्यक्रम यशस्वीतेसाठी मुख्याध्यापक प्रशांत कुलकर्णी व संदीप दुकळे सर यांनी परिश्रम घेतले.
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या वेषात असणारा शालेय विद्यार्थी साईराज देवरे याचे उपस्थितांनी कौतुक केले
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मुख्याध्यापक कुलकर्णी सर यांनी केले तर आभार सहशिक्षक संदीप दुकळे सर यांनी मानले

Previous articleआगळ्या वेगळ्या पध्दतीने रात्री बारा वाजता शिवजन्मोत्साचा जल्लोष!                          पुजा टेन्ट हाऊसचा अनोखा सोहळा
Next articleमेशी परिसरात शिवजयंती उत्साहात साजरी
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.