Home युवा मराठा विशेष आगळ्या वेगळ्या पध्दतीने रात्री बारा वाजता शिवजन्मोत्साचा जल्लोष!         ...

आगळ्या वेगळ्या पध्दतीने रात्री बारा वाजता शिवजन्मोत्साचा जल्लोष!                          पुजा टेन्ट हाऊसचा अनोखा सोहळा

256

राजेंद्र पाटील राऊत

आगळ्या वेगळ्या पध्दतीने रात्री
बारा वाजता शिवजन्मोत्साचा जल्लोष!                          पुजा टेन्ट हाऊसचा अनोखा सोहळा
मालेगांव,(राजेंद्र पाटील राऊत युवा मराठा न्युज नेटवर्क)- अखंड हिंदुस्थानाचे दैवत,सिंहासनाधीश्वर छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती दिनांक १८ फेब्रुवारी रोजी रात्री बरोबर बारा वाजताच एका आगळ्या वेगळ्या व अनोख्या पध्दतीने नाशिकच्या मालेगांव शहरात साजरी करण्यात आली.
कोरोना महामारीच्या संसर्गानंतर पहिल्यांदाच एवढया मोठया उत्साही वातावरणात महाराजांच्या जयंतीचा उत्साह दिसून आला.मालेगांवच्या सटाणा नाका भागात असलेल्या स्वप्नपुर्तीनगर परिसरातील पुजा टेन्ट हाऊसचे मालक संचालक संजय नामदेव महाले पाटील यांनी छत्रपती शिवाजी महाराज जयंती महोत्सवाचे आयोजन केले होते.रात्री बारा वाजता पुजा टेन्ट हाऊस स्वप्नपुर्तीनगर या ठिकाणी अत्यंत जल्लोषपुर्ण वातावरणात छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावांचा जयघोष करीत फटाक्यांच्या आतषबाजीत व विविध प्रकारच्या रोषणाईच्या प्रकाशात महाराजांचा जन्मोत्सव मोठ्या जल्लोषात व उत्साहात साजरा करण्यात आला.याप्रसंगी शिवरायांच्या पराक्रमाचे गीत वाजवून आनंद साजरा करण्यात आला.या कार्यक्रमाचे आयोजन पुजा टेन्ट हाऊसचे मालक संचालक तथा युवा मराठा न्युजचे कार्यकारी संपादक संजय नामदेव महाले पाटील यांनी केले होते.या छत्रपती शिवरायांच्या जन्मोत्सव कार्यक्रमास युवा मराठा न्युजचे मुख्य संपादक राजेंद्र पाटील राऊत,राकेश बळीराम जाधव,प्रविण सुरेश पाटील,नारायण शांताराम जाधव,हर्षल जाधव,अंकूश जाधव,गणेश जाधव,योगेश हिरे,विशाल गुजराथी,दिपक जाधव,गणेश गुरव,राजबिंद राजू बिंद ,वैभव मोरे,दर्शन गुरव,आदर्श जाधव,बंटी खैरनार,नयन सोनवणे,पवन देसले,राज अहिरे,साहील महाले,तात्या महाले,राकेश महाले,गोलू आदी शिवप्रेमी बहुसंख्येने उपस्थित होते.
(याच जन्मोत्सवाची व्हिडीओ न्युज बघा आज दुपारी ३ वाजता युवा मराठा न्युजवर)

Previous articleयेवती येथे नेत्ररोग व रक्त तपासणी शिबिर
Next articleदेवीमळा (कौ) येथे छत्रपती शिवाजी महाराज जयंती संपन्न आश्रयआशा फाऊंडेशन कडून शालेय साहित्य  वाटप       
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.