Home नांदेड येवती येथे नेत्ररोग व रक्त तपासणी शिबिर

येवती येथे नेत्ररोग व रक्त तपासणी शिबिर

181
0

राजेंद्र पाटील राऊत

येवती येथे नेत्ररोग व रक्त तपासणी शिबिर

नांदेड/मनोज बिरादार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क

शिवजयंती उत्सव २०२२ व ग्रामपंचायत कार्यालय येवती यांच्या यशस्वी वर्षपुर्ती निमित्ताने २० फेब्रुवारी रोज रविवार येवती येथे भव्य नेत्ररोग तपासणी
नेत्र शस्त्रक्रिया व रक्त तपासणी शिबीराचे आयोजन करण्यात आले असून येवती व परिसरातील सर्व नागरिकांनी याचा लाभ घ्यावे असे आवाहन सरपंच डॉ.उमेश पाटील यांनी केले आहे.

मोतिबिंदू रुग्णाची व संपुर्ण डोळ्यांच्या आजारांची तपासणी व रक्त तपासणी मोफत करण्यात येणार आहे. तरी सुजान नागरिकांनी दि .२० तारखेला रविवारी येवती ग्राम पंचायत समोर येवून या शिबिरांचा लाभ घ्यावा.
यावेळी प्रमुख पाहूणे म्हणून डॉ . आर . एस . लखोटिया ( अध्यक्ष उदगिरी लायन्स नेत्र रुग्णालय , उदगीर ) डॉ . अर्चना पवार ( जेष्ठ नेत्र तज्ञ ) , डॉ . गणेश जोगदंड ( नेत्र चिकित्सक ) डॉ . प्रशांत गायकवाड डॉ.उमेव पाटील यांची उपस्थिती राहणार आहे.

शस्त्रक्रियेनंतर 7 व 40 दिवसांनी नेत्र तपासणी करणे बंधनकारक राहील शस्त्रक्रियेचे ठिकाण : उदगिरी लायन्स क्लब , उदगीर जि . लातूर वेळ : सकाळी 10 ते सायंकाळी 4 पर्यंत : रक्त तपासणी : शिव पॅथोलॉजी लॅब हिमोग्लोबीन , शुगर , कावीळ , रक्तगट यासाठी नोंदणी शुल्क 10 / – रु . राहील याची सर्वांनी नोंद घ्यावे असे सरपंच डॉ. उमेश पाटील व उपसरपंच बालाजी नागरगोजे यांनी कळविले आहे.

Previous articleलग्न जुळत नसल्याने तरुणाने अंगावर पेट्रोल ओतून घेतलं; जाळून घेताच शेतातील गंजीही पेटली अन् होरपळून मृत्यू
Next articleआगळ्या वेगळ्या पध्दतीने रात्री बारा वाजता शिवजन्मोत्साचा जल्लोष!                          पुजा टेन्ट हाऊसचा अनोखा सोहळा
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here