Home विदर्भ लग्न जुळत नसल्याने तरुणाने अंगावर पेट्रोल ओतून घेतलं; जाळून घेताच शेतातील गंजीही...

लग्न जुळत नसल्याने तरुणाने अंगावर पेट्रोल ओतून घेतलं; जाळून घेताच शेतातील गंजीही पेटली अन् होरपळून मृत्यू

219
0

राजेंद्र पाटील राऊत

लग्न जुळत नसल्याने तरुणाने अंगावर पेट्रोल ओतून घेतलं; जाळून घेताच शेतातील गंजीही पेटली अन् होरपळून मृत्यू       बुलढाणा,(स्वप्निल देशमुख ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क)
युवकाने स्वतःचे सरण रचत अंगावर पेट्रोल ओतून आत्महत्या केल्याची चर्चा; पोलिसांनी मात्र फेटळालं युवकाने स्वतःचे सरण रचत अंगावर पेट्रोल ओतून आत्महत्या केल्याची चर्चा रंगली होती. पण पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तरुणाने स्वतः च्या अंगावर पेट्रोल टाकून जाळून घेतले. त्यामुळे शेतातील पऱ्हाटीची गंजी जळाले. युवकाने सरण रचले नव्हते असं पोलीस पाटील गजानन पाटील यांनी सांगितलं आहे. खामगाव ग्रामीण पोलीस या प्रकरणी पुढील तपास करत आहेत. लग्न जुळत नसल्याने तरुणाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. बुलढाण्यातील खामगाव तालुक्यात ही घटना घडली आहे. लग्न जुळत नसल्याने आलेल्या नैराश्यातून त्याने आत्महत्या केल्याची माहिती आहे. गुरुवारी सकाळी ही घटना उघडकीस आली.

खामगाव तालुक्यातील पळशी खुर्द येथील महेंद्र नामदेव बेलसरे (२७) या तरुणाचे लग्न जुळत नव्हते. त्यामुळे तो निराशेच्या गर्तेत सापडला होता. गुरुवारी सकाळी शेतात जळालेल्या अवस्थेत त्याचा मृतदेह आढळून आला. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठले. निराशेतून युवकाने आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज पोलीस सूत्रांनी व्यक्त केला.

Previous articleटी.के.आर.एच.विद्यालयात कोवीड प्रतिबंधक लसीकरण दुसर्‍या टप्प्यास प्रारंभ
Next articleयेवती येथे नेत्ररोग व रक्त तपासणी शिबिर
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here