Home नांदेड नांदेडमधील रेमडेसीव्हर इंजेक्शनचा काळा बाजार थांबवा व साठेबाजांवर तात्काळ कार्यवाही करा –...

नांदेडमधील रेमडेसीव्हर इंजेक्शनचा काळा बाजार थांबवा व साठेबाजांवर तात्काळ कार्यवाही करा – राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस प्रदेशसर चिटणिस वसंत सुगावे पाटील

107
0

राजेंद्र पाटील राऊत

नांदेडमधील रेमडेसीव्हर इंजेक्शनचा काळा बाजार थांबवा व साठेबाजांवर तात्काळ कार्यवाही करा – राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस प्रदेशसर चिटणिस वसंत सुगावे पाटील

राजेश एन भांगे / युवा मराठा न्युज नेटवर्क

नांदेड जिल्ह्यात कोरोना या संसर्गजन्य रोगाचा हाहाकार झाला असून यामध्ये जिल्ह्यातील अनेकांना कोरोनाची लागण झाली आहे.

यावेळी अत्यावस्थ प्रकृती असलेल्या कोरोनाग्रस्त रुग्णांना उपचारा साठी लागणारे रेमडेसीव्हर इंजेक्शन अवश्यक असून
मात्र ते इंजेक्शन सध्या बाजारात उपलब्ध नाही असे दाखवून मेडिकल औषधी दुकानदार चढ्या भावाने या इंजेक्शनची विक्री करत आहेत.
त्यामुळे अशा साठेबाजांवर तात्काळ कार्यवाही करून रेमडेसीवर इंजेक्शन रुग्णांना उपलब्ध करून द्यावे

अशी मागणी राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस पार्टीचे प्रदेशसर चिटणीस
वसंत सुगावे पाटील यांनी निवेदना द्वारे निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. सचिन खल्लाळ यांच्याकडे कडे केली आहे.
नांदेड जिल्ह्यात दिवसाला १००० ते १५०० रुग्णांना कोरोनाची लागण होत आहे.
तर आजवेळी अनेक रुग्णांची प्रकृती गंभीर चिंताजनक आहे.
अशावेळी रुग्णांवर उपचारासाठी रेमडेसीवर इंजेक्शन आवश्यक आहे.

त्यामुळे या इंजेक्शनची मागणी वाढत आहे. ही वाढती मागणी लक्षात घेऊन मेडिकल औषधी दुकानदार अन्न व औषध प्रशासन या विभागाच्या अधिकाऱ्यांना हाताशी धरून या इंजेक्शनचा काळा बाजार करत आहेत.

यावर अन्न व औषध प्रशासन विभागाचे कुठल्याही प्रकारचे नियंत्रण नाही.
हे इंजेक्शन वेळेवर मिळाले नसल्यामुळे अनेक रुग्णांचा यावेळी दुर्दैवी मृत्यू देखील झाला आहे.
व अनेक रुग्ण गंभीर असून रेमडेसीवर इंजेक्शन रुग्णांना सहजरीत्या व माफक दरात उपलब्ध होईल अशी व्यवस्था प्रशासना मार्फत करावी अशी मागणी करण्यात आली.

यावेळी राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे प्रदेशसचिव बाळासाहेब भोसीकर, राष्ट्रवादी ग्रंथालय आघाडीचे जिल्हाध्यक्ष संतोष दगडगावकर, राष्ट्रवादी सोशल मिडिया जिल्हाध्यक्ष शादूल होणवडजकार, हणमंत जगदंबे आदी सदस्य उपस्थित होते.

Previous articleनाशिक हादरले!! इथे मृत्यूही ओशाळला महाराष्ट्र राज्यातील मोठ्ठी दुर्घटना
Next articleरुग्णालयाकडे जाणारा ऑक्सिजनचा टँकर मध्यरात्री बंद पडला 🛑
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here