Home नांदेड मराठा आरक्षण प्रश्न सत्ताधारी व विरोधक एकत्रपणे प्रयत्न करत नाहीत – खा....

मराठा आरक्षण प्रश्न सत्ताधारी व विरोधक एकत्रपणे प्रयत्न करत नाहीत – खा. छत्रपती संभाजीराजे

121
0

राजेंद्र पाटील राऊत

मराठा आरक्षण प्रश्न सत्ताधारी व विरोधक एकत्रपणे प्रयत्न करत नाहीत – खा. छत्रपती संभाजीराजे
संग्राम पाटील तांदळीकर
मुखेड तालुका शहर प्रतिनिधी
सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण नाकारले असलेतरी मराठा आरक्षण मिळावे यासाठी सत्ताधारी व विरोधाक एकत्रपणे प्रयत्न करत नाहीत. ते एकमेकांना दोष देत टिका करण्याचे काम करत असल्याचा आरोप खा. छत्रपती संभाजीराजे यांनी केला आहे.

मराठा आरक्षण बाबत अभ्यासकांची व समाज बांधवांची मते जाणून घेण्यासाठी खा. छत्रपती संभाजीराजे महाराष्ट्र दौऱ्यावर आसून आज मंगळवार (ता.२५) रोजी नांदेड येथे आले होते. यादरम्यान आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. पूढे बोलताना ते म्हणाले की, यापूर्वी ५८ मराठा मोर्चे निघालेले आहेत त्यातून समाजाच्या भावना कळल्या आहेत. तेव्हा आता आंदोलने नकोत अशी आमची भूमिका आहे. घटना दुरुस्ती व्हावी की पुनर्विचार व्हावा याबद्दल निर्णय घेणे गरजेचे आहे. मराठा आरक्षण सत्ताधारी विरोधक यांच्या आमदार खासदार यांनी एकत्रित येवून प्रयत्न करण्याचा विषय आहे. मात्र दुर्दैवाने तसे न होता केवळ एकमेकांनवर टिका करण्यात येत आहेत. न्यायालयात आरक्षण रद्द झाले हे खरे आहे. का रद्द झाले कोणामुळे रद्द झाले ह्या बदल भूमिका मांडण्यासाठी नव्हे तर आता मार्ग काय काढायचा याबदल मी दौऱ्यावर आहे असे ते म्हणाले. दौऱ्याअंती काय ती भूमिका आपण घेणार आहेत असे देखील ते म्हणाले. यावेळी मराठा समाजातील विविध संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.

Previous articleधनज ते धनज फाटा रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे मा कार्यकारी अभियंता जि प कार्यालयाला निवेदन
Next articleशेतकऱ्यांनी उगवणक्षमता तपासून बियाणांचा वापर करावे -कृषी सहायक श्री जोशी सर
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here