Home माझं गाव माझं गा-हाणं नाशिक हादरले!! इथे मृत्यूही ओशाळला महाराष्ट्र राज्यातील मोठ्ठी दुर्घटना

नाशिक हादरले!! इथे मृत्यूही ओशाळला महाराष्ट्र राज्यातील मोठ्ठी दुर्घटना

162
0

राजेंद्र पाटील राऊत

नाशिक हादरले!! इथे मृत्यूही ओशाळला
महाराष्ट्र राज्यातील मोठ्ठी दुर्घटना
(राजेंद्र वाघ/ दिलीप चव्हाण युवा मराठा)
नाशिक -झाकीर हुसेन रुग्णालयात २२कोरोना रुग्णांचा मृत्यू टँकला गळती लागल्यामुळे आँक्सिजन पुरवठा खंडीत.नाशिकमधील झाकीर हुसेन रुग्णालयात आँक्सिजन टाकीला गळती लागल्यामुळे आँक्सिजन पुरवठा खंडीत होऊन २२करोना रुग्णांचा जागीच तडफडून मृत्यू झाला.गँस गळतीनंतर काही रुग्णांना इतरत्र सुरक्षित हलविण्यात आले आहे.तर काही जणांना वेळीच आँक्सिजन न मिळाल्याने त्यांचाही मृत्यू होऊन मृतांचा आकडा वाढला आहे.दुर्घना घडली तेव्हा या रुग्णालयात १३१ रुग्ण दाखल होते.तर सुमारे २० ते २५ करोनाबाधित रुग्ण हे रुग्णालयाच्या आवारातच दाखल होते.मृताचा आकडा वाढण्याची शक्यता जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांनी घटनास्थळी भेट दिल्यानंतर व्यक्त केली आहे.
आज दुपारी एक वाजेच्या दरम्यान गँसच्या प्रेशरमुळे आँक्सिजन टाकीचे नोझल तुटल्याचा दावा यंत्रणेने केला आहे.नातेवाईकांचा आरडाओरडा ,हदय पिळवटून टाकणारा हंबरडा,यामुळे घटनास्थळी एकच कल्लोळ माजला होता.आँक्सिजन गळती सुरु असताना परिसरात धुरासारखे चित्र निर्माण झाल्याने सुमारे दोन ते अडीच तास उपस्थितांना काहीच समजून येत नव्हते.काही नातेवाईक अधिकारी वर्ग व पत्रकार मंडळी धावून गेल्याने तांत्रिक पथकाच्या मदतीने दीड तासानंतर रुग्णालयाचा आँक्सिजन पुरवठा हळूहळू पुर्वपदावर आला.जिल्हा रुग्णालय व इतर जिल्ह्यातून आँक्सिजनचे टँकर मागवून ते या रुग्णालयाच्या टाकीत सोडण्याचे काम सुरु होते,आँक्सिजन टाकी व यंत्रणेची योग्य देखभाल केली जात नसल्याचा आरोप शिवसेनेने केला असून,दोषीवर कठोर कारवाईची मागणी केली आहे.सुरुवातीला ११ कोरोना रुग्णांचाच बळी गेल्याची माहिती महानगरपालिका आयुक्तांनी दिली.नंतर मात्र हा आकडा २२ झाल्याचे सांगण्यात आले.
…………………….,…………………………
मयतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी पाच
लाखाची मदत
आँक्सिजन गळतीच्या घटनेची उच्चस्तरीय समितीव्दारे चौकशी केली जाणार असल्याची माहिती विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी दिली.तर पालकमंत्री छगन भुजबळ जिलूहाधिकारी सुरज मांढरे महापालिका आयुक्त कैलास जाधव यांनीही घटनास्थळी भेट देत मदतकार्याबाबत सुचना दिल्या.पोलिस आयुक्त दिपक पांडे यांनीही भेट देत रुग्णालयाचा परिसर सील केला.हा परिसर आज सायंकाळ पर्यत बंद राहिल,अशी माहिती त्यांनी दिली,नेमका दोष कुणाचा होता याची चौकशी केली जाईल.तसेच मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी पाच लाख रुपये मदतीची घोषणा पालकमंत्री छगन भुजबळ यांनी यावेळी केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here