Home उतर महाराष्ट्र रुग्णालयाकडे जाणारा ऑक्सिजनचा टँकर मध्यरात्री बंद पडला 🛑

रुग्णालयाकडे जाणारा ऑक्सिजनचा टँकर मध्यरात्री बंद पडला 🛑

105
0

राजेंद्र पाटील राऊत

🛑 रुग्णालयाकडे जाणारा ऑक्सिजनचा टँकर मध्यरात्री बंद पडला 🛑
✍️ नगर 🙁 विजय पवार महाराष्ट्र प्रतिनिधी युवा मराठा न्युज )

नगर :-⭕मंगळवारी नगर शहरातील बहुतांश रुग्णालयातील ऑक्सिजन संपत आला होता. त्यामुळे महतप्रयासाने ऑक्सिजनचे टँकर उपलब्ध केले. त्यातील एक टँकर शहरात आल्यावर बंद पडला. पहाटे अडीचच्या सुमारास पोलिस, यंत्रणा आणि तरुण कार्यकर्त्यांनी त्यासाठी धडपड करून हा टँकर जिल्हा रुग्णालयात पोहोचता केला. नगरला रात्री दोन टँकर मिळाले असून किमान आज दिवसभराची चिंता मिटली आहे.

नगरचे माजी जिल्हाधिकारी आणि सध्या एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पी. अन्बलगन यांनी विशेष लक्ष घालून नगरसाठी चाकण एमआयडीसीतून ऑक्सिजन उलब्ध करून दिला आहे.

त्यांचे आणि रात्री धावपळ करून टँकर दुरूस्त केलेल्या तरुणांचे नगरमध्ये कौतूक होत आहे.
रात्री नगरसाठी ऑक्सिजन उपलब्ध झाला. तो घेऊन टँकर नगरला आला.

जिल्हा रुग्णालयापासून काही अंतरावर लाल टाकी रोडवर टँकर बंद पडला. त्यामध्ये तांत्रिक बिघाड झाला होता. काही केल्या चालकाकडून तो सुरू होत नव्हता. सोबतच्या पोलिसांनी आणि प्रशासनाने तातडीने प्रयत्न सुरू केले. जेसीबी यंत्र बोलाविण्यात आले, त्याच्या सहायाने अगर इतर वाहनाद्वारे टँकर ओढून नेता येतो का, ते पाहिले.

मात्र त्यातही यश येत नव्हते. अखेर टँकर दुरूस्तीसाठी कोणी फिटर उपलब्ध होतो का, असेही प्रयत्न झाले.

याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसच्या अल्पसंख्याक सेलचे साहेबान जहागिरदार यांना मिळाली. वैभव ढोणे व इतर सहकाऱ्यांसोबत त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. रात्रीतून वाहनाची दुरूस्ती करणाऱ्या एका फिटरला उठवून आणण्यात आले. त्याने तातडीने दुरूस्ती केली. इकडे ऑक्सिजन संपत आल्याने सर्वांसाठी एक एक मिनीट महत्वाचा होता. अथक प्रयत्न करून शेवटी टँकर रुग्णालायात आणून टाकीत ऑक्सिजन भरण्यात आला.

जिल्ह्याला दोन टँकरद्वारे सुमारे ३० टन ऑक्सिजन रात्री उपलब्ध झाला.

यावर आजचा दिवस कसाबसा निघू शकतो. रात्री पुन्हा व्यवस्था करावी लागेल, असे सांगण्यात आले. ⭕

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here