Home बुलढाणा शेगांव नगर परिषदेचा भोगंळ कारभार करवाढ आक्षेप सुनावणीचे नियोजन चूकले ,पत्रकारास चित्रीकरण...

शेगांव नगर परिषदेचा भोगंळ कारभार करवाढ आक्षेप सुनावणीचे नियोजन चूकले ,पत्रकारास चित्रीकरण करण्यास केला मज्जाव मुख्याधिकारी जयश्री काटकर यांच्या हिटलरशाहीचा निषेध!

85
0

राजेंद्र पाटील राऊत

IMG_20231211_203533.jpg

शेगांव नगर परिषदेचा भोगंळ कारभार करवाढ आक्षेप सुनावणीचे नियोजन चूकले ,पत्रकारास चित्रीकरण करण्यास केला मज्जाव मुख्याधिकारी जयश्री काटकर यांच्या हिटलरशाहीचा निषेध!
महेंद्र देशमुख प्रतीनिधी शेगांव
बुलढाणा जिल्ह्यातील शेगांव नगर परिषदेने वार्षिक कर मूल्यांकनाची सूचना जारी केली आहे . या कर आकारणीबाबत मालमत्ता करधारकांचे काही आक्षेप असतील तर ते त्यांनी नोंदवण्याचे आवाहन करण्यात आले आहे . यासाठीची मुदत 7 डिसेंबर ऐवजी 20 डिसेंबर करण्यात आली आहे . नगर परिषद क्षेत्रातील कर वाढविल्यामुळे सर्वसामान्यांना याचा फटका बसणार आहे . वाढीव करांसारखे महत्त्वाच्या विषयावर जनतेचे प्रतिनिधी , लोकांनी निवडून दिलेले राजकारणी आणि अधिकारी यांनी एकत्र बसून सोडवणे गरजेचे असते . मात्र गेल्या 2 वर्षांपासून नगर परिषदेची , निवडणूक न झाल्याने या नगर परिषदेवर प्रशासक नेमण्यात आला आहे .
नगर परिषदेने वार्षिक कर मूल्यांकन सूचना वितरित केली असून यामध्ये मालमत्ता करात मोठी वाढ सुचवण्यात आली आहे . अनेक नागरिकानी या करवाढीच्या प्रस्तावाला विरोध केला आहे . नगर परिषदेकडुन एका दिवसात 10 वार्डातील नागरिकाचे करवाढीवर म्हणणे ऐकुन घेताच येत नाही मग फक्त नागरिकाना वेठीस धरण्याचा प्रकार नगर परिषदेकडुन होताना दिसत आहे. महिला वर्ग व ज्येष्ठ नागरीक आज नगर परीषदेमध्ये तास न तास उभे रांगेमध्ये उभे होते. चौकट….. या सगळ्या प्रकाराचे चित्रीकरण युवा मराठा न्यूजचे शेगाव प्रतिनिधी महेंद्र देशमुख हे करीत असताना शेगाव येथील मुख्याधिकारी जयश्री काटकर यांनी अगदी हिटलरशाही थाटात देशमुख यांना चित्रीकरण बंद कर…असा आवाज देऊन लोकशाहीतल्या चौथ्या आधारस्तंभाची गळचेपी करण्याचा निंदनीय प्रकार केला.बहूतेक जयश्री काटकर यांना एवढेही पुरेसे ज्ञान नसावे की पत्रकाराला चित्रीकरण करण्यास कुणी मज्जाव अथवा मनाई करु शकत नाही असा सर्वाच्च न्यायालयाचा आदेश असतानाही काटकर कुणाच्या भिस्तिवर हे पत्रकारावर दबाव तंत्र दाखवित आहेत आता खरे तर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याचाही सखोल शोध घ्यावा अशी मागणी पुढे येत आहे.दरम्यान काटकर यांच्या हिटलरशाही वर्तणूकीचा युवा मराठा महासंघ महाराष्ट्राच्या वतीने तीव्र निषेध नोंदविण्यात येत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here