राजेंद्र पाटील राऊत
मालेगाव तालुका राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षा कडुन जोडे मारो आंदोलन
मालेगांव,(श्रीमती आशाताई बच्छाव व्यवस्थापकीय संपादक युवा मराठा न्युज नेटवर्क) देशात व राज्यात कोरोनाची परिस्थिती अतिशय बिकट आहे. राज्यात दररोज रूग्णांच्या संख्येचे नवनवीन विक्रम प्रस्थापित होत आहेत. अशा परिस्थितीत राज्य सराकर रूग्णांच्या सेवेसाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. परंतु अशाही परिस्थितीत विरोधी पक्ष राजकारण करत आहे. राज्यसरकार कसे अडचणीस येईल असा प्रयत्न करत आहे. राज्यात रेमडेसिवीर इंजेक्शनच्या मोठा तुटवडा आहे. रूग्णांचे जीव जात आहे. या इंजेक्शनचा राज्यात मोठ्या प्रमाणात कंपनीकडून काळा बाजार होत आहे. दरम्यानच्या काळात ब्रुक फार्मा कंपनीचे मालकाला पोलीसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतल्यानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस व प्रविण दरेकर हे थेट पोलीस ठाण्यात पोहचले व कंपनी मालकाची वकीली करू लागले. पोलीसांवर दबाब आणून त्याची त्वरीत सुटका करावी अशी मागणी केली. कंपनीच्या मालकासाठी विरोधीपक्ष नेत्याचे पोलीस ठाण्यात जावे ही एक अभुतपुर्व घटना आहे व त्यांनी त्या पदाची प्रतिष्ठा धुळीस मिळवली आहे. पोलीसांनी काही चुकीचे केले आहे असे त्यांना वाटत होते तर त्यांनी मुख्यमंत्री यांना किंवा गृहमंत्री यांना फोन करून संपर्क करू शकत होते. परंतु थेट पोलीस ठाणे गाठून पोलीसांवर दबाब आणणे असे वर्तन विरोधीपक्ष नेत्यांना शोभत नाही. इंजेक्शनचासाठा भाजपाने कंपनीकडून खरेदी केला असून तो महाराष्ट्रात वाटप करावयाचा होता असा दावा विरोधी पक्षनेत्यांनी केला. इतका टंचाईच्या काळात भाजपाला हा साठा कसा मिळाला हा मोठा प्रश्र आहे. हे अतिशय निघृर्ण प्रकाराचे राजकारण आहे. जिथे भाजप निष्पाप लोकांच्या जिवाशी खेळत आहे.
तरी मालेगाव तालुुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची अशी मागणी आहे की महाराष्ट्रद्रोही विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस व प्रविण दरेकर यांच्यावर सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा.या प्रसंगी तालुका अध्यक्ष संदीप पवार, विजय पवार, दिनेश ठाकरे,जयेश अहिरे, राजेंद्र पवार, नवनाथ शिल्लक, सतीश पवार,धीरेंद्र चव्हाण,शेखर पवार, कुणाल कदम,भाऊसाहेब पवार,आशीष निकम,रितेश पवार आदी उपस्थित होते.