Home कोरोना ब्रेकिंग | राज्यात २२ एप्रिल रात्री ८ पासून कडक लॉकडाऊन, हे आहेत नवे...

| राज्यात २२ एप्रिल रात्री ८ पासून कडक लॉकडाऊन, हे आहेत नवे नियम राज्यात 22 एप्रिलपासून नवीन नियम लागू करण्यात आले आहेत.

122
0

राजेंद्र पाटील राऊत

| राज्यात २२ एप्रिल रात्री ८ पासून कडक लॉकडाऊन, हे आहेत नवे नियम

 

राज्यात 22 एप्रिलपासून नवीन नियम लागू करण्यात आले आहेत.

मुखेड तालुका प्रतिनिधी मनोज बिरादार (युवा मराठा न्यूज नेटवर्क)

मुंबई : राज्य सरकारकडून आज नवीन नियम जारी करण्यात आले आहेत, या नियमांनुसार राज्यातील लॉक डाऊन कडक होणार असल्याचं दिसून येत आहे. कारण अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांशिवाय आणि तसेच ठराविक वेळेत जीवनावश्यक वस्तूंची खरेदी करण्याशिवाय घराबाहेर पडता येणार नाही आहे.

एवढंच काय एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात काय, तर एका शहरातून दुसऱ्या शहरात प्रवास करता येणार नाहीय. लग्नात २५ पेक्षा जास्त लोकांची उपस्थिती असेल तर ५० हजारांचा दंड ठोठावला जाणार आहे. याआधी हा दंड फक्त १० हजार होता, त्यामुळे १० हजार रुपयात सुटका होत होती, पण आता ५० हजार आणि कारवाईचा देखील सामना करावा लागणार

काय आहेत नवे नियम

– लोकल ट्रेनमधून आता फक्त अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांनाच प्रवास करता येणार आहे. तर 50 टक्के लोकांना उभे राहून प्रवास करता येणार. पण नियमानुसार ठोस कारण असावं
– खासगी वाहतुकीसाठी फक्त 50 टक्के प्रवाशांना परवानगी देण्यात आली आहे. नियम मोडल्यास 10 हजारांचा दंड वसूल करण्यात येणार आहे.
– लग्नकार्यासाठी फक्त 25 लोकांनाच उपस्थित राहता येणार. 2 तासात लग्नकार्य उरकावे लागणार आहे.
– सर्व सरकारी कार्यालयांमध्ये केवळ 15 टक्के उपस्थितीनुसार कामकाज होणार आहेत. तर अत्यावश्यक सेवेतील कार्यालयांमध्ये 50 टक्के कर्मचाऱ्यांना उपस्थित राहता येणार आहे. पण गरज पडली तर 100 टक्के कर्मचाऱ्यांना बोलवता येणार आहे.
– सरकारी कार्यालयांमध्ये १५ टक्के हजेरी – राज्य आणि केंद्रीय कार्यालयांसाठी हा नियम लागू
– २२ एप्रिल २०२१ ते १ मे २०२१ पर्यंत हा कडक लॉकडाऊन लागू असेल.
– लग्नाला २५ पेक्षा जास्त लोक उपस्थित राहिल्यास आता ५० हजारांचा दंड
– एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात आणि एका शहरातून दुसऱ्या शहरात ट्रॅव्हल्स सेवा बंद
– एका शहरातून जाण्यास परवानगी नाही, प्रवास केल्यास १४ दिवस होम क्वारंटाईन करणार, दंडात्मक कारवाई देखील होवू शकते.
– अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना रेल्वे प्रवासाची भूमा
– एसटी बस, खासगी वाहनांमध्ये ५० टक्के प्रवाशांनी प्रवास करता येणार
– अत्यावश्यक सेवेशिवाय, तसेच ठोस कारणानेच प्रवास करा, किंवा घराबाहेर या, ठोस कारण नसल्यास प्रवास करणाऱ्यांना १० हजारांचा दंड
– प्रवासादरम्यान कुणालाही कोरोना सारखी लक्षणं दिसल्यास वैद्यकीय तपासणीनंतर कोरोना सेंटरला रवानगी होईल.
– किराणा, दूध, फळे, अंडी, मटण, भाजीपाला (जीवनावश्यक वस्तू) याविषयी नवीन नियमात कोणताही उल्लेख करण्यात आलेला नसल्याने सकाळी ७ ते ११ दरम्यान ही विक्री आणि खरेदी करता येणार आहे.

Previous articleमालेगाव तालुका राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षा कडुन जोडे मारो आंदोलन
Next articleठेंगोडा येथे घरफोडी अडीच लाखाचा माल चोरटयांनी केला लंपास..!
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here