Home सोलापूर बार्शी वैराग रोडवर दुचाकी व ट्रकचा भीषण अपघात

बार्शी वैराग रोडवर दुचाकी व ट्रकचा भीषण अपघात

108
0

आशाताई बच्छाव

IMG-20230618-WA0036.jpg

बार्शी वैराग रोडवर दुचाकी व ट्रकचा भीषण अपघात

युवा मराठा न्यूज आँनलाईन वेब पोर्टल महादेव घोलप

 

बार्शीकडे चाललेल्या अशोक लेलँड ट्रक व दुचाकीचा भीषण अपघात होऊन दुचाकी वरील दोघे जागीच ठार झाले आहेत.सोलापूर हुन बार्शीकडे चाललेला अशोक लेलँड ट्रक क्रमांक MH45- AS 2025 व हिरो CBZ दुचाकी क्रमांक MH13 AP 2662 यांचा भीषण अपघात होऊन दुचाकी वरील नारायण घोपल (वय 42) काशिनाथ उर्फ पिंटू अरुण नरोटे (वय 43) हे दोघेजण अपघातात जागीच ठार झाले आहेत. दुचाकी वरील दोघेजण बार्शीहून दडशिंगे या आपल्या गावी जात असताना हा अपघात घडला आहे. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत अपघातग्रस्तांना शासकीय रुग्णालयात नेल्याचे समजते. हा अपघात एवढा भीषण होता की , दुचाकीवरील दोन्ही व्यक्तींचे शरीराचे अवयव रस्त्यावर विखुरले होते. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत अपघातग्रस्त वाहने बाजूला करून रस्ता वाहतुकीसाठी खुला केला.

Previous articleमहिला बचतगटांच्या माध्यमातून महिलांना बचतीची सवय लागते —संगीता तावरे
Next articleफादर्स डे निमित्त दापोडी मध्ये पोलिसांना व विविध चर्च मध्ये फादर डे उत्साह साजरा करण्यात आला
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here