• Home
  • कोल्हापूरात आंदोलन स्थळीच होळीचा सण साजरा

कोल्हापूरात आंदोलन स्थळीच होळीचा सण साजरा

राजेंद्र पाटील राऊत

IMG-20210329-WA0014.jpg

कोल्हापूरात आंदोलन स्थळीच होळीचा सण साजरा

आंदोलन स्थळीच होळीचा सण साजरा -वारणा प्रकल्प व चांदोली अभयारण्य ग्रस्त यांचा आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलनाचा 28 वा दिवस आहे आपल्या कोणत्याही मागण्या ,प्रशासनाकडुन मान्य न झाल्यामुळे हताश झालेल्या आंदोलकानी आपल्या वसाहती मध्ये न जाता, ‘कुटुंबाविना ,मुलाबाळा शिवाय दुःखी मनाने होळी पेटवली .यावेळी शासनास लवकर जाग’येऊन आमच्या मागण्या मान्य होवू देत अशी प्रार्थना करीत आपल्या देवाचे नाव स्मरण करून रस्त्यावरच होळी पेटवली व पूजा करून होळी चा सण साजरा केला यावेळी मारुती पाटील ,अशोक पाटील,प्रकाश बेलवलकर , अकबर पन्हाळकर ,आनंदा आमकर ,पांडुरंग पवार यासह अनेक आंदोलक उपस्थित होते (युवा मराठा न्युज नेटवर्क)

anews Banner

Leave A Comment