• Home
  • कोल्हापूर जिल्हा माध्यमिक शिक्षक पतसस्थेची सभा आँनलाईन पद्धतीत

कोल्हापूर जिल्हा माध्यमिक शिक्षक पतसस्थेची सभा आँनलाईन पद्धतीत

राजेंद्र पाटील राऊत

IMG-20210329-WA0015.jpg

कोल्हापूर जिल्हा माध्यमिक शिक्षक पतसस्थेची सभा आँनलाईन पद्धतीत

कोल्हापूर :कोल्हापूर जिल्हा माध्यमिक शिक्षक पतसस्थेची ५० वी वार्षिक सर्वसाधारण सभा जवळ – जवळ साडेतीन तासाहून अधिक काळ ऑनलाईन पद्धतीने ‘ उत्साहात पार पडली.
सभासदांना ३० लाख रुपयांचे अपघाती विमा कवच योजना लागू करणार ,
*मा दादासाहेब लाड* यांनी आपल्या स्वागत पर भाषणातून सांगितले व
” *महिला सभासदांच्या सन्मानासाठी कोजिमाशिसे सखी मंच च्या माध्यमातून सशक्त व्यासपीठ निर्माण करणार असे म्हणाले तर “संस्थेचे चेअरमन बाळ डेळेकर *यांनी बँकेचा लेखा-जोखा मांडला तसेच
संपूर्ण राज्यात आपली पतसंस्था आदर्श आहे हे पटवून दिले याचे खरे मानकरी आपले सभासद बंधू आहेत असे आपल्या मनोगतातुन व्यक्त केले .
येणारी निवडणूक बिनविरोध करून आपल्या पतसंस्थेचे संपूर्ण देशात
नाव करू या असे आव्हान केले .
पुढच्या वर्षी पासून सभासदांना
३५ लाख पर्यत कर्ज मर्यादा, सिनियर अँटॅच ज्युनियर कॉलेजमधील कार्यरत सेवकांना सभासद करणार, ४० % अनुदान पात्र शाळातील सभासदांना वाढीव कर्ज देणार* , सर्व शाखात सी सी यंत्रणा यासह अनेक ठराव मंजूर करत अभूतपूर्व उत्साहात कोजिमाशिसे पतसंस्था कोल्हापूरची सभा संपन्न झाली, सभेस १हजार ४०० पे क्षा अधिक सभासद online उपस्थित होते , सभासद भगिनीनी पहिल्यादाच या सभेस सूचना व्यक्त करून उत्कृष्ट व्यवस्थापना बद्दल संचालक मंडळाचे आभार मानले . सभा अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात साडेतीन तास चालली, सर्व प्रश्नाची उत्तरे देवून व प्रत्येकास क्रमवार संधी देवून अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने सभा संपन्न झाली आभार व्हा चेअरमन सुभाष पाटील यांनी मानले, यावेळी सर्व संचालक उपस्थित होते. (युवा मराठा न्युज नेटवर्क)

anews Banner

Leave A Comment