• Home
  • दिल्लीतील जागतिक नेमबाजी स्पर्धेची अभिज्ञा पाटील रौप्यपदकाची मानकरी

दिल्लीतील जागतिक नेमबाजी स्पर्धेची अभिज्ञा पाटील रौप्यपदकाची मानकरी

राजेंद्र पाटील राऊत

IMG-20210329-WA0072.jpg

दिल्लीतील जागतिक नेमबाजी स्पर्धेची अभिज्ञा पाटील रौप्यपदकाची मानकरी

पेठ वडगांव : तळसंदे (ता.हातकणंगले ) येथील आंतरराष्ट्रीय नेमबाज अभिज्ञा अशोक पाटील हिने दिल्लीमधील जागतिक नेमबाजी स्पर्धेत रौप्यपदक पटकावले. महिलांच्या वरिष्ठ गटात अभिज्ञाने २५ मीटर रॅपिड फायर पिस्तूल मिश्र गटातून पंजाबच्या गुरप्रीत सिंगच्या जोडीने अभिज्ञा पाटील रौप्यपदकाची मानकरी ठरली.
अंतिम फेरीत भारताच्या टीम क्रमांक २ मधून अभिज्ञा आणि गुरप्रीत सिंग (पंजाब) हे दोन खेळाडू सहभागी होते तर भारताच्याच टीम क्रमांक एकमध्ये तेजस्विनी (हरियाणा) आणि विजयवीर सिद्धू (पंजाब) या दोन खेळाडूंची निवड केलेली होती. अंतिम फेरीत अभिज्ञा आणि गुरप्रीत सिंग यांना रौप्यपदक मिळाले
भारताचा विजयवीर सिद्धू आणि तेजस्विनी यांनी आयएसएसएफ विश्वचषक नेमबाजी स्पर्धेतील २५ मीटर रॅपिड फायर पिस्तूल मिश्र गटात सुवर्णपदक मिळवले.
अभिज्ञा ही जिल्हा क्रिडा प्रबोधिनी कोल्हापूरची अनिवासी आंतरराष्ट्रीय नेमबाजपटू आहे. तिला प्रबोधिनीचे प्राचार्य डॉ.चंद्रशेखर साखरे यांचे मार्गदर्शन मिळाले.तसेच तिला गगन नारंग शूटिंग फाउंडेशन पुणे आणि नॅशनल रिफील असोसिएशन ऑफ इंडियाचे जॉईंट सेक्रेटरी पवन सिंग यांचे विशेष मार्गदर्शन लाभले. तिला कोल्हापूर जिल्हा मेन अँड वुमन रायफल असोसिएशनचे अध्यक्ष युवराज साळुंखे यांचे सहकार्य लाभले.
आंतरराष्ट्रीय नेमबाजपटू गगन नारंग, सय्यद तौसिफ, वेद, संदीप तरटे, अजित पाटील, युवराज साळुंखे यांचे अभिज्ञाला मार्गदर्शन लाभले. यशश्री उद्योग समूहाचे विकासराव पाटील आणि विद्यासागर पाटील यांचे प्रोत्साहन लाभले.
तसेच श्रीकृष्ण उद्योग समूह खोचीचे संस्थापक अध्यक्ष बी.के. चव्हाण,
माजी उपसरपंच एम. के. चव्हाण,श्री शाहू शिक्षण प्रसारक सेवा मंडळ संस्थेचे अध्यक्ष  माजी.पोलीस आयुक्त गुलाबराव पोळ, संस्थेच्या सचिवा,मा. नगराध्यक्षा विद्या (ताई)पोळ तसेच आई प्रतिभा पाटील, वडील अशोक पाटील यांचे मार्गदर्शन मिळाले. (युवा मराठा न्युज नेटवर्क)

anews Banner

Leave A Comment