• Home
  • साडेसात वर्षाच्या मुलीसोबत अश्लील चाळे केल्याप्रकरणी एकास अटक

साडेसात वर्षाच्या मुलीसोबत अश्लील चाळे केल्याप्रकरणी एकास अटक

राजेंद्र पाटील राऊत

IMG-20210330-WA0015.jpg

साडेसात वर्षाच्या मुलीसोबत अश्लील चाळे केल्याप्रकरणी एकास अटक

कोल्हापूर : उजळाईवाडी येथील
पोपट सखाराम नाईक वय-५० याने साडेसात वर्षाच्या मुलीस दुकानात बोलवून तिच्यासोबत अश्लील चाळे केल्याप्रकरणी
त्यास उजळाईवाडी पोलीसानी केली अटक.
पोलिसांकडून मिळालेली सविस्तर माहिती अशी,
पोपट नाईक याच्या उज्वल शाँपी दुकानात ती लहान मुलगी मॅगी मसाला आणण्यासाठी २३ तारखेला दुपारी बाराच्या दरम्यान आपल्या भावासोबत गेली असता तिला दुकानात बोलावून लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य आरोपीने केले अशी फिर्याद पीडित मुलीच्या आईने गोकुळ शिरगाव पोलिस ठाण्यात दिली. आरोपीविरुद्ध बाललैंगिक अपराध संरक्षण कायद्या अंतर्गत गुन्हा नोंद झाला असून अधिक तपास गोकुळ शिरगाव पोलिस स्टेशनचे पोलिस उप.नि. रविकांत गच्‍चे करित आहेत.
पोपट नाईक याचे किराणा दुकान व खानावळ आहे. गेली २० वर्ष तो या भागात राहत आहेत. अश्लील चाळे प्रकरणात गुन्हा नोंद होणार असल्याचे समजतात परिसरातील प्रतिष्ठित नागरिक, ग्रामपंचायत पदाधिकारी यांनी गोकुळ शिरगाव पोलिस ठाण्यांमध्ये धाव घेत संशयीत आरोपी सामाजिक कार्यात अग्रेसर असतो त्यामुळे पोपट नाईक यांच्याकडून असा प्रकार घडणे शक्य नाही यामुळे पोलिसांनी योग्य तपास करावा करावा अशी विनंती नागरिकांकडून केली आली. (युवा मराठा न्युज नेटवर्क)

anews Banner

Leave A Comment