Home नांदेड रामपूर येथे आरोग्य शिबीर संपन्न..

रामपूर येथे आरोग्य शिबीर संपन्न..

39
0

आशाताई बच्छाव

IMG_20240202_182408.jpg

रामपूर येथे आरोग्य शिबीर संपन्न..

देगलूर तालुका प्रतिनिधी, (गजानन शिंदे)

देगलूर :-
अडत व्यापारी शिक्षण संस्था संचलित देगलूर महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनेच्या वार्षिक विशेष युवक शिबीर मौजे-रामपूर येथे उपजिल्हा रुग्णालय,देगलूर यांच्या सौजन्याने आरोग्य शिबिर संपन्न झाले.
या शिबिरात ग्रामस्थ व विद्यार्थ्याची आरोग्य तपासनी करुण औषधी देन्यात आले. कुष्ठरोग, टी.बी., अनेमीया, एन.सी.डी दंतरोग,सीकलसेल टेस्टींग, बी.पी.,शुगर इत्यादी आजाराबाबत तपासणी करण्यात आली सोबतच विद्यार्थ्यांना आरोग्य विषयक मार्गदर्शन करण्यात आले.या आरोग्य शिबिरात वैद्यकीय अधीक्षक डॉ. नरेश देवनीकर यांच्या मार्गदर्शनाख़ाली डॉ. संजय इंगळे,डॉ.शहानवाज शेख, डॉ.फारुकी एफ. एक. , डॉ.सावळे जी.स.,डॉ.मोना ओहळ,कु.जयश्री बाबळे,सौ. छाया पाटील, विनायक पाटील, श्रीमती शेख एस.एस., श्रीमती रेखा कांबळे इत्यादी जिल्हा रुग्णालयातील टीमने राष्ट्रीय सेवा योजनेच्या शिबिरास भेट देऊन गावकऱ्यांची व राष्ट्रीय सेवा योजनेतील स्वयंसेवकांची आरोग्य तपासणी केली.डॉ.ओहळ यांनी गूटखा व तंबाखू जन्य पदार्थ सेवनामुळे होनारे दुष्परिणाम या बदल विस्तृत मार्गदर्शन केले सोबतच बाबळे यांनी सीकलसेल या आजारांबाबत मार्गदर्शन केले.मानसिक आरोग्य चांगले राहण्यासाठी मोबाईलचा अतिवापर टाळावा असे आवाहन सौ.पाटिल यांनी केले. या शिबिरास प्रा काळे व्ही एन , डॉ खंदकुरे व्यंकट प्रा गणेश क्यादारे व सरपंच सौ स्नेहा पांडवे , ग्रामस्थ यांनी परिश्रम घेतले.

Previous articleलैलेशा भुरे यांना राज्यस्तरीय काव्यगौरव पुरस्कार
Next articleरामपूर येथे आरोग्य शिबीर संपन्न..
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here