Home सामाजिक तिसगाव येथे शासकीय नियमांचे पालन करून भीम जयंती साजरी

तिसगाव येथे शासकीय नियमांचे पालन करून भीम जयंती साजरी

273

तिसगाव येथे शासकीय नियमांचे पालन करून भीम जयंती साजरी
तिसगाव तालुका देवळा येथेदिनांक 14 एप्रिल 2021 रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 130 वी जयंती शासनाच्या नियमानुसार साजरी करण्यात आली मात्र कोरोणाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे मिरवणूक आदी कार्यक्रम रद्द करण्यात आले असुन सोशल डिस्टंसिंग चे पालन केले व प्रत्येक कुटुंबासाठी डाँ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यासाठी व पुजेसाठी वेळ ठरवुन देण्यात आली होती तसेच ठिकाणी सर्व भीमसैनिकांनी मास्क , सॅनिटायझर चा वापर करुन व सोशल डिस्टंसिंग चे पालन करून प्रतीव्यक्ती ३ फुट असे अंतर ठेऊन लहान मुलांचा भाषणे , गाण्यांचा कार्यक्रम व बुध्दवंदना , पंचशिल ञिशरण घेऊन कार्यक्रम पार पडला. तसेच तिसगाव ग्रामपंचायत कार्यालयातही ग्रामपंचायत सदस्य अँड. पंकज गायकवाड डॉ. समाधान गायकवाड तसेच ग्रामपंचायत कर्मचारी भाऊसाहेब आहेर व शरद आहेर यांच्या उपस्थितीत प्रतिमा पूजन झाले तसेच डाँ.बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यास देवळा तालुका पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक यांच्या हस्ते पूजन होऊन भीम जयंतीचा समारोप करण्यात आला.

Previous article🛑 हे पवारांच सरकार आहे तुमच्या बापाच्यान पडणार नाय आनंद शिंदेंचा गाण्यातून फडणवीसांना टोला 🛑
Next article🛑 कोरोना लसीकरण महोत्सव 🛑
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.