Home उस्मानाबाद धाराशिव साखर कारखान्यावरती आयकर विभागाचा छापा संपला!

धाराशिव साखर कारखान्यावरती आयकर विभागाचा छापा संपला!

55
0

आशाताई बच्छाव

IMG-20220829-WA0020.jpg

पुणे, हवेली तालुका प्रतिनिधी श्री संजय वाघमारे: धाराशिव साखर कारखान्यावरती आयकर विभागाचा छापा संपला! धाराशिव साखर कारखाना यांच्यावरती गेली चार दिवसापासून आयकर विभागाची कारवाई सुरू होत. अभिजीत पाटील यांनी हा धाराशिव कारखाना सुरुवात केली. चार दिवसाच्या चौकशीमध्ये त्यांना काहीही सापडले नाही असे अभिजीत पाटील यांनी सांगितले. चार दिवस जवळपास १०० ते १२५ लोकांची कसून चौकशी केली. परंतु या चौकशीमध्ये कुठल्याही प्रकारची मालमत्ता त्याचबरोबर सापडलेले सोने यांच्या बद्दल कुठलाही आक्षेप घेण्यासारखे काहीही आढळले नाही. धाराशिव साखर कारखाने यांनी ७० कोटींचे कर्ज घेतले होते व त्याचे हप्ते वेळेवर चालू आहेत हे त्यांना त्या ठिकाणी माहिती झाले. थोडेफार काही त्रुटी असतील तर त्याच्यावरती अभिजीत पाटील यांनी १५ दिवसाच्या मुदतीवर या तुरटी वरती काम करू असेही सांगितले. जवळपास आयकर विभागांना १ कोटी १२ लाख रोकड सापडली. परंतु या संपूर्ण रोकड संदर्भात कुठलाही पुरावा न सापडल्यामुळे, त्याचबरोबर या संदर्भात पूर्ण माहिती दिल्यामुळे अभिजीत पाटील त्यांना ती रोकड परत करावी लागली. अभिजीत पाटलांनी माध्यमांना सांगितले की हा सर्व राजकीय षडयंत्र माझ्या विरोधकांनी माझ्या विरोधात केल्यामुळे हा आयकर विभागाचा प्रकार घडला. परंतु त्यांना एकाच सांगतो की तुम्ही एक हात आतापर्यंत दाखवला आता माझे दोन्ही हात मोकळे आहेत .हा कारखाना जर बंद पडला तर विरोधकांना किती आनंद होईल हे त्यांनी सांगितले .परंतु हा कारखाना बंद पडल्यानंतर शेतकऱ्यांचे व शेतकऱ्यांच्या उसाचे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान होईल असे त्यांनी सांगितले. एकंदरीत काय तर चार दिवसाच्या चौकशीनंतर आयकर विभागांना काहीही न मिळाल्यामुळे त्यांना ही कारवाई थांबवावी लागली.

Previous articleकोल्हापूर येथील प्रसिद्ध गोकुळ दूध संघाची आज सर्वसाधारण वार्षिक सभा होणार!
Next articleजे. टी. कासलीवाल इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये राष्ट्रीय क्रीडा दिन जल्लोषात आणि उत्साहात साजरा…
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here