Home नाशिक जे. टी. कासलीवाल इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये राष्ट्रीय क्रीडा दिन जल्लोषात आणि...

जे. टी. कासलीवाल इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये राष्ट्रीय क्रीडा दिन जल्लोषात आणि उत्साहात साजरा…

47
0

आशाताई बच्छाव

IMG-20220829-WA0026.jpg

जे. टी. कासलीवाल इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये राष्ट्रीय क्रीडा दिन जल्लोषात आणि उत्साहात साजरा… नांदगांव प्रतिनिधी-अनिल धामणे
दि 29 ऑगस्ट 2022,नांदगाव येथील जे. टी. कासलीवाल इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये राष्ट्रीय क्रीडा दिन जल्लोषात आणि उत्साहात साजरा करण्यात आला.
यावेळी हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद यांना जे.टी. कासलीवाल विद्यालयातील शालेय क्रिडा मंत्री अनुष्का सोनवणे या विद्यार्थ्यीनीच्या हातून प्रतिमा पूजन व पुष्पहार आर्पन करून अभिवादन करण्यात आले. खेळल्यामुळे आपले शरीर तंदुरुस्त राहते म्हणून आपण दररोज भरपूर खेळलेच पाहिजे. असा संदेश यावेळी देण्यात आला. या निमित्ताने शाळेत खो-खो, कबड्डी सामन्यांचे आणि रिले स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी स्पर्धेक विद्यार्थ्यांचा उत्साह अवर्णनीय होता.
शाळेचे मुख्याध्यापक ,मनी चावला सर यांनी या कार्यक्रमानिमित्त विविध खेळांची माहिती दिली. क्रीडा शिक्षक अशोक बागुल यांनी हॉकी खेळाचे नियम समजावून मेजर ध्यानचंद यांची हॉकी खेळातील जागतिक कामगिरीची माहिती दिली.
सर्व स्पर्धक विद्यार्थ्यांना राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त संस्थेचे चेअरमन सुनीलकुमार कासलीवाल तसेच संस्थेचे सेक्रेटरी विजय चोपडा, जुगलकिशोर अग्रवाल, रिखबचंद कासलीवाल, महेंद्र चांदीवाल,सर्व पदाधिकारी, प्रशासन अधिकारी प्रकाश गुप्ता, मुख्याध्यापक मनी चावला सर, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी शुभेच्छा दिल्या.

Previous articleधाराशिव साखर कारखान्यावरती आयकर विभागाचा छापा संपला!
Next articleचामोर्शी तालुका क्रीडांगणाच्या कामाला लवकरच बांधकामाला होणार सुरुवात आमदार डॉक्टर देवरावजी होळी
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here