Home गडचिरोली साहेब आम्ही दुपारी दोन वाजता पासून उन्हा तान्हात उभे आहोत, आमच्या साठी...

साहेब आम्ही दुपारी दोन वाजता पासून उन्हा तान्हात उभे आहोत, आमच्या साठी दुसऱ्या बसची व्यवस्था करा?!!…..

42
0

राजेंद्र पाटील राऊत

साहेब आम्ही दुपारी दोन वाजता पासून उन्हा तान्हात उभे आहोत, आमच्या साठी दुसऱ्या बसची व्यवस्था करा?!!…..
भ्रमणध्वनी वरील तक्रारीची आ, डॉ, होळी दखल घेतात ,व लगेच दुसऱ्या बसची व्यवस्था करतात तेंव्हा !!
गडचिरोली,(सुरज गुंडमवार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क)
हनुमान जयंती च्या दिवशी
गडचिरोली विधानसभा मतदार संघाचे आमदार डॉ देवराव होळी यांचा हनुमान जयंती निमित्त दरवर्षी प्रमाणे या वर्षी सुद्धा चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यतील विविध हनुमान मंदिरात दर्शनासाठी दौरा आयोजित होता
चंद्रपूर जिल्ह्यातील दौरा आटोपून मूल मार्गाने गडचिरोली जिल्ह्यत प्रवेश केल्याबरोबर आमदार डॉ होळी यांना भ्रमणध्वनीवर घोट येथील एका भगिनी द्वारे माहिती मिळाली की अहेरी आगारातील एका बसने साठ सत्तर प्रवाशी चामोर्शी मार्गाने अहेरी , चामोर्शी ,आष्टी , आलापल्ली अहेरी कडे निघाले होते परंतु बस मधे बिघाड झाल्याने बस मधील प्रवासी दुपारी दोन वाजता पासून वाकडी फाट्यावर ताटकळत उभे आहेत, परंतु एस्टी महामंडळ ने अजूनपर्यंत कोणतीच व्यवस्था केली नाही ? आधीच एस्टी बसेस कमी व हनुमान जयंती असल्याने खाजगी वाहतूक सुद्धा कमीच होती काहीतरी व्यवस्था होईल म्हणून सायंकाळी पाच वाजेपर्यंत सर्व पुरुष , महिला,भगिनी आपल्या लहान लेकरांना घेऊन रस्त्यावरच उभे होते , सदर माहिती मिळताच आमदार डॉ होळी यांनी तत्काळ विभागीय नियंत्रक वाडी भस्मे साहेब यांना फोन केला पण ते उपलब्ध होऊ शकले नाही
परंतु गडचिरोली एस्टी आगाराचे
पांडे साहेब यांच्या सोबत चर्चा केल्यावर आमदार डॉ होळी यांनी सांगितले जोपर्यंत दुसरी बस येणार नाही तोपर्यंत मी वाकडी फाट्यावरच थांबणार आहे ? बोलणे झाल्यावर त्यांनी लगेच दुसऱ्या बसची व्यवस्था केली व पंधरा मिनिटात वाकडी फाट्यावर दुसरी बस पाठवली बस येताच सर्व प्रवाष्यानी सुटकेचा निःश्वास टाकला ,व सर्वांना आमदार डॉ होळी व गडचिरोली तालुका भाजप महामंत्री हेमंत भाऊ बोरकुटे ,भाजप तालुका अध्यक्ष दिलीप चलाख यांनी सर्व प्रवाश्यांना बसमधे बसण्यास सांगितले व आमदार डॉ देवराव होळी पुढे मार्गस्थ झाले यावेळी सर्व प्रवाश्यानी आमदार डॉ होळी यांचे आभार मानले

Previous articleधर्मातंरीत आदिवासीना डीलिस्टिंग करन्या करीता संविधानातील 342 मध्ये भारत सरकारने दुरस्ती करावि प्रकाश गेडाम,प्रांत संयोजक
Next articleमनाला स्थिर करण्यासाठी समाजाला भागवताची गरज- खा. अशोक नेते
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here