Home गडचिरोली मनाला स्थिर करण्यासाठी समाजाला भागवताची गरज- खा. अशोक नेते

मनाला स्थिर करण्यासाठी समाजाला भागवताची गरज- खा. अशोक नेते

61
0

राजेंद्र पाटील राऊत

मनाला स्थिर करण्यासाठी समाजाला भागवताची गरज- खा. अशोक नेते

निलज ( ब्रम्हपुरी) येथील श्रीमद भागवत सप्ताहाचा उत्साहात समारोप

गडचिरोली,( सुरज गुंडमवार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क)
आजच्या धकाधुकीच्या आधुनिक, विज्ञान युगात जीवन धावपळीचे झालेले आहे. ग्रामीण भागापेक्षा तर मोठ्या शहरातील जीवनमान लोकल ट्रेन सारखे आहे यात माणसाला अर्धा तास ही निवांतपणा मिळत नाही त्यामुळे तरुण युवक, नागरिकांमध्ये टेन्शन व चीडचिडपणा वाढलेला आहे. अशा धावपळीतून बाहेर निघून थोडा निवांत व मन स्थिर करण्यासाठी आज समाजाला भागवता सारख्या धार्मिक कार्यक्रमाची गरज आहे. यातून नागरिकांना काही दिवस का होईना पण मनाला व बुद्धीला आराम मिळते व आचार विचारांची देवाणघेवाण होऊन त्यांच्या ज्ञानात भर पडते. त्यामुळे गावागावात भागवता सारखे धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यासाठी नागरिकांनी पुढाकार घ्यावा व एक व्यसनमुक्त पिढी घडविण्याचा संकल्प करावा, असे प्रतिपादन खासदार अशोक नेते यांनी केले.भागवत सप्ताहाचा समारोपीय कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थाना वरून मार्गदर्शन करताना ते बोलत होते.
ब्रम्हपुरी तालुक्यातील नीलज येथे श्रीमद भागवत सप्ताहाचे आयोजन 10 ते 16 एप्रिल दरम्यान करण्यात आले होते काल दि. 16 एप्रिल रोजी या भागवत सप्ताहाचा समारोप भाजपचे अनुसूचित जनजाती मोर्चा चे राष्ट्रीय सरचिटणीस तथा खासदार अशोक नेते यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आला. यावेळी विशेष अतिथी व मार्गदर्शक म्हणून ब्रम्हपुरीचे माजी आमदार प्रा. अतुलजी देशकर प्रामुख्याने उपस्थित होते. प्रमुख पाहुणे म्हणून जिप सदस्य तथा भाजपचे जिल्हा महामंत्री संजयजी गजपुरे, माजी जिप उपाध्यक्ष तथा जिप सदस्य कृष्णाजी सहारे, पं स सभापती रामलालजी डोनाडकर, माजी सभापती वंदनाताई शेंडे, भाजपचे ज्येष्ठ नेते डॉ बालपांडे, अशोकराव डोनाडकर, शेंडेजी, निलजचे सरपंच हेमंत ठाकरे व अन्य मान्यवर उपस्थित होते.

या भागवत सप्ताहात सातही दिवस हभप महाराजांनी विविध उदाहरणे देऊन नागरिक व महिलांना मोलाचे मार्गदर्शन केले. गावातील पूर्ण वातावरण भागवतमय झाले होते. मोठ्या उत्साहात व आनंदात गोपाळ काला व दहीहंडी फोडून या भागवत सप्ताहाचा समारोप करण्यात आला. या भागवत सप्ताहात गावातील व इतर लगतच्या गावातील नागरिक, महिला, युवक-युवती व लहान मुलेही मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

Previous articleसाहेब आम्ही दुपारी दोन वाजता पासून उन्हा तान्हात उभे आहोत, आमच्या साठी दुसऱ्या बसची व्यवस्था करा?!!…..
Next articleशिवसेनेच्या दणक्याने चातगाव रांगी रस्त्याच्या दुरुस्तीला सुरुवात
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here