Home गडचिरोली शिवसेनेच्या दणक्याने चातगाव रांगी रस्त्याच्या दुरुस्तीला सुरुवात

शिवसेनेच्या दणक्याने चातगाव रांगी रस्त्याच्या दुरुस्तीला सुरुवात

32
0

राजेंद्र पाटील राऊत

शिवसेनेच्या दणक्याने चातगाव रांगी रस्त्याच्या दुरुस्तीला सुरुवात

शिवसेना सहसंर्पक प्रमुख तथा जिल्हा नियोजण समिती सदस्य अरविद भाऊ कात्रटवार यांनी दिला होता आंदोलनाचा इशारा

गडचिरोली,(सुरज गुंडमवार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क)
गडचिरोली तालुक्यातील मौशीखांब-मुरमाडी जिल्हा परीषद क्षेत्रातून जाणाऱ्या चातगाव-रांगी या प्रमुख मार्गाची दुरावस्था झाली होती याबाबत शिवसेना सहसंपर्क प्रमुख तथा जिल्हा नियोजन समिती सदस्य अरविंद भाऊ कात्रटवार यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे लक्ष वेधले होते . रस्त्याची तातडीने दुरुस्ती न झाल्यास तिव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला होता . कात्रटवार यांच्या मागणीची दखल घेवून संबंधीत विभागाने रांगी-चातगाव रस्त्याचा दुरुस्ती कामाला सुरुवात केली आहे . चातगाव-रांगी हा प्रमुख मार्ग असून या मार्गावर दिवसरात्र वाहनाची वर्दळ सुरु असते या रस्त्याची गेल्या अनेक महिन्यापासून दुरअवस्था झाली होती . रस्त्यावर जागोजागी खड्डे पडले होते त्यामुळे अपघाताच्या धोका वाढला होता चातगाव-रांगी मार्गावर अनेक गावे आहेत . तसेच हा मार्ग धानोरा आरमोरी कडे जात असल्याने मोठया प्रमाणात वाहतुक सुरु असते . रस्ता पुर्णपणे उकडुन गेला होता . रस्त्यावर जागोजागी खड्डे पडले होते . त्यामुळे दुचाकी व चारचाकी वाहनधारकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत होता . तसेच या मार्गावर अनेक छोटे मोठे अपघाताचे घटना घडल्या आहेत . त्यामुळे या रस्त्याची तातडीने दुरुस्ती करावी अशी मागणी . मुरमाडी मौशीखांब जिल्हा परिषद क्षेत्रातील शिवसैनिकांनी शिवसेनेचे सहसंपर्क प्रमुख तथा जिल्हा नियोजन समिती सदस्य अरविद भाऊ कात्रटवार यांच्या कड़े केली होती. अरविदभाऊ कात्रटवार यांनी रांगी-चातगाव रस्त्याची दुरुस्ती करण्याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाकडे पाठपुरावा केला होता . रस्त्याची गंभीर समस्या तातडीने न सोडविल्यास शिवसेनेच्या वतीने तिव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा सार्वजनिक बांधकाम विभागाला दिला होता . शिवसेनेच्या वतीने देण्यात आलेल्या आंदोलनाच्या इशाऱ्याचा धसका घेऊन सार्वजनिक बांधकाम विभागाने रांगी-चातगाव रस्त्याच्या दुरुस्तीचे काम सुरु केले आहे . शिवसेना सहसंपर्क प्रमुख तथा जिल्हा नियोजन समिती सदस्य अरविद भाऊ कात्रटवार यांनी रस्ता दुरुस्तीचा कामाला शिवसैनिकांसह भेटू देवून प्रत्यक्ष पाहणी केली . याप्रसंगी अरविंद भाऊ कात्रटवार शिवसेना सहसंपर्क प्रमुख तथा जिल्हा नियोजन समिती सदस्य यादव लोहंबरे उपतालुका प्रमुख शिवसेना गडचिरोली , स्वप्निल खांडरे , राहुल सोरते , संजय शेंडे , निकेश लोहंबरे , मोतीराम भुरसे , निरंजन लोहंबरे , नेपाल लोहंबरे , जगन चापडे , प्रविण मिसार , विनोद मडावी , सुमीत सोनटक्के , सुरेश मडावी , गोपाल मॉगरकार , किशोर देशमुख , अरुण चिचोलकार , चरण देशमुख , संदीप भुरसे , संजय चांग , अविनाश झोडे,यांच्या सह या भागातील शिवसैनिक व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते

Previous articleमनाला स्थिर करण्यासाठी समाजाला भागवताची गरज- खा. अशोक नेते
Next articleवासखेडी येथे महात्मा गांधी विद्यालयात संस्थेचे संस्थापक अध्यक्षांचा ७५वा अमृत महोत्सव साजरा
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here