Home Breaking News व-हाणे प्रकरणात अखेर सरपंच अपात्रतेचा प्रस्ताव दाखल;पुढील कार्यवाहीकडे महाराष्ट्राचे लक्ष!

व-हाणे प्रकरणात अखेर सरपंच अपात्रतेचा प्रस्ताव दाखल;पुढील कार्यवाहीकडे महाराष्ट्राचे लक्ष!

293
0

आंशुराज पाटिल मालेगाव कार्यालय

Screenshot_20230904-175905_One-UI-Home.jpg

व-हाणे प्रकरणात अखेर सरपंच अपात्रतेचा प्रस्ताव दाखल;पुढील कार्यवाहीकडे महाराष्ट्राचे लक्ष!
( राजेंद्र पाटील राऊत)
मालेगांव– गत तीन वर्षापासून या ना त्या कारणावरुन गाजत असलेल्या नाशिकच्या मालेगांव तालुक्यातील व-हाणे ग्रामपंचायतीच्या सरपंच सौ.अनिता भरत पवार यांना अपात्र करण्यासाठी अखेर शासनाकडे प्रस्ताव दाखल झाला आहे.
व-हाणेतील जागा प्रश्नावरुन सुरु झालेला हा लढा अनेक उपोषण आंदोलने, आत्मदहन,माहिती अधिकार व विविध प्रकारच्या संघर्षातून ग्रामपंचायतीच्या भोंगळ व मनमानी कारभाराची लक्तरे अक्षरशः वेशीवर टांगली गेली आहेत.अशातच ४ आँक्टोबर २०२१ मध्ये गणपूर्ती नसताना ग्रामसेविका सुवर्णा सांळुखे यांच्या संगनमताने बोगस व बनावट ग्रामसभा घेऊन शासनाची दिशाभूल करुन फसवणूक केली आणि पदाचा गैरवापर करुन कर्तव्यात कसूर केले म्हणून हा सरपंच अपात्रतेचा प्रस्ताव कलम ३९ प्रमाणे दाखल झाला असून, त्यासोबतच ग्रामसेविका सांळुखे यांचेवर कलम ३९ प्रमाणे कार्यवाहीचा प्रस्ताव सादर करण्यात आला आहे.
.………..चौकट…………
चोरांच्या उलटया बोंबा..!
या ग्रामसभेला गैरहजर असलेल्या पाच सदस्यांनी स्वतः च सुचक म्हणून आपले कर्तृत्व दाखवून प्रोसिडींग वर मात्र कुठेच या सदस्यांच्या सहया नाहीत,तरीही अधिकाऱ्यांना जबाब देतांना म्हटले आहे की,आम्हांला सहया करण्याचा विसर पडला होता.हे पाच सदस्यांचे जबाब म्हणजे बालिशपणाचे लक्षण असून,येथेही सदस्यांनी आपल्याच अकलेचे तारे तोडलेले आहेत.प्रत्यक्षात जबाब देणारे पाच सदस्य जर ग्रामसभेला हजर होतेच तर मग ग्रामसभेच्या प्रोसिंडीगवर सहया न करण्याचे षडयंत्र कुटील कारस्थान अगोदरच ग्रामसेविका सुवर्णा सांळुखे यांच्या संगनमताने सरपंच सौ.अनिता भरत पवार यांना गोत्यात व अडचणीत आणण्यासाठी पुर्वनियोजीत होते,म्हणूनच गणपूर्ती पूर्ण नसतानाही सांळुखे यांनी ग्रामसभा कोणत्या अधिकारात व नियमात घेतली? कुणाच्या दबावाला बळी पडून सरपंचाला पायउतार करण्यासाठी हे कारास्थान रचले याचाही पर्दाफाश लवकरच होईल.आणि या प्रकरणी लोकशाही मार्गाने लोकआयुक्त व मुंबई उच्च न्यायालयातून दाद मागण्यात येईल.हा लढा अजून संपलेला नाही,अशी प्रतिक्रिया या प्रकरणावर बोलताना युवा मराठा महासंघाचे संस्थापक अध्यक्ष राजेंद्र पाटील राऊत यांनी दिली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here