Home गडचिरोली लव्ह जिहाद सारख्या घटना थांबविण्यासाठी जागृत व्हा मुला-मुलींवर चांगले विचार व संस्कार...

लव्ह जिहाद सारख्या घटना थांबविण्यासाठी जागृत व्हा मुला-मुलींवर चांगले विचार व संस्कार घडविण्याची गरज

79
0

आशाताई बच्छाव

IMG-20230122-WA0036.jpg

लव्ह जिहाद सारख्या घटना थांबविण्यासाठी जागृत व्हा
मुला-मुलींवर चांगले विचार व संस्कार घडविण्याची गरज

यवतमाळच्या प्रखर अभ्यासक ऍड. मंजुषाताई देव यांचे प्रतिपादन
मातृशक्ती संमेलनाला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

गडचिरोली,(सुरज गुंडमवार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क):- 
आपली भारतीय संस्कृतीच सर्वश्रेष्ठ असून आपण भारतीय संस्कृती विसरत चाललोय आजच्या तरुण युवक-युवती भारतीय संस्कृती जपण्याकडे दुर्लक्ष करीत असून पाश्चात्त्य देशाचे अनुकरण करीत आहेत त्यामुळे समाजात अनेक वाईट गोष्टी व घटना घडत आहेत. यावर नियंत्रण मिळवण्यासाठी सर्व महिलांनी आपल्या मुला मुलींवर चांगले विचार व संस्कार घडवण्याची आज समाजाला गरज असून वाईट गोष्टीला सोडून चांगल्या गोष्टींचा अवलंब करणे आवश्यक आहे. आज समाजामध्ये लव्ह जिहाद च्या अनेक घटना भारतात घडत आहेत आपण ते उघड्या डोळ्यांनी पाहूनही काहीही करू शकत नाही त्यामुळे वेळीच जागृत होऊन यासारख्या घटना थांबविण्यासाठी आपल्याला चांगल्या मार्गदर्शनाची व संस्काराची गरज असून लव्ह जिहाद सारख्या राक्षसाला नष्ट करण्यासाठी आपण पुढाकार घेतला पाहिजे. महिलांनी आपल्या मुला मुलींना चांगले विचार व मार्गदर्शन करून व जुन्या घटनांची उदाहरणे देऊन सर्व घटक व सर्व बाबींची माहिती द्यावी व त्या वाम मार्गाकडे वळणार नाही याची दक्षता प्रत्येक महिलेने घ्यावी असेही यावेळी एडवोकेट मंजुषाताई देव यानी सांगितले.

आपल्या भारतातील काही भागात ख्रिश्चन व मुस्लिम समाजातील काही घटक हिंदू समाजातील मुला-मुलींना जबरदस्तीने धर्मांतर करायला लावत आहेत यासाठी आपण वेळीच जागृत होऊन याची दखल घेऊन समाजात व महिलांमध्ये जागृती करणे आवश्यक आहे त्यांच्या भुलथापांना व आमिषाला बळी न पडता आपण सजग राहून यापासून दूर राहू शकतो तसेच आपण आपल्या मुलांवर योग्य संस्कार व विचार रुजवण्याची समाजाला आज गरज आहे व त्यासाठी सर्व मातुशक्तींनी परिश्रम घ्यावे व समाजाला वाईट प्रवृत्ती पासून वाचवण्यासाठी प्रयत्न करावे, असे प्रतिपादन यवतमाळ येथील सामाजिक, सांस्कृतिक व राष्ट्रीय विचारधारेच्या प्रखर अभ्यासक एडवोकेट मंजुषाताई देव यांनी केले. सामाजिक समरसता व सामाजिक सदभाव गडचिरोलीच्या वतीने स्वर्गीय राजारामजी काबरा स्मृती भवन गडचिरोली येथे आज दिनांक 22 जानेवारी रोजी आयोजित मातृशक्ती संमेलनात उपस्थित शेकडो महिलांना मार्गदर्शन करताना त्या बोलत होत्या.

कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून आम डॉ देवरावजी होळी, सामाजिक कार्यकर्त्या सौ माणिकताई ढोले, गडचिरोली च्या माजी नगराध्यक्ष योगीताताई पिपरे प्रामुख्याने उपस्थित होत्या. कार्यक्रमात महिलांनी मोठ्या संख्येने सहभागी होत मातृशक्ती संमेलनातील मार्गदर्शनाचा लाभ घेतला. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सामाजिक समरसता व सामाजिक सदभाव गडचिरोलीच्या पदाधिकारी व सदस्यांनी अथक परिश्रम घेतले.

Previous articleमौजा रामनगर ( गेवरा ) येथे नशा ही घराणेशाही ची नाटक संपन्न
Next articleविकासाच्या नावाखाली लुटीचा डाव : संसाधनांच्या रक्षणासाठी एकत्र यावे
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here