Home जळगाव चुंचाळे ग्रामपंचायतच्या ग्रामसेवकाची दंबगीरी व मनमानी कारभाराच्या विरुद्ध सरपंच व उपसरपंच यांची...

चुंचाळे ग्रामपंचायतच्या ग्रामसेवकाची दंबगीरी व मनमानी कारभाराच्या विरुद्ध सरपंच व उपसरपंच यांची गटविकास अधिकारी यांच्याकडे तक्रार.

51
0

आशाताई बच्छाव

IMG-20230617-WA0027.jpg

चुंचाळे ग्रामपंचायतच्या ग्रामसेवकाची दंबगीरी व मनमानी कारभाराच्या विरुद्ध सरपंच व उपसरपंच यांची गटविकास अधिकारी यांच्याकडे तक्रार.

जळगांव जिल्हा ब्यूरो चिफ, योगेश पाटील.
ग्रामसेवकाच्या दंबगीरीला व मनमानी कारभाराला कंटाळुन सरपंच आणि ग्रामपंचायत सदस्यांचे पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी यांच्याकडे तक्रार तात्काळ ग्रामसेवकची बदली न झाल्या दिला आमरण उपोषणाचा ईशारा. या संदर्भात चुंचाळे तालुका यावल येथील ग्रामपंचायतच्या सरपंच नौशाद मुबारक तडवी, उपसरपंच मनोज फकीरा धनगर यांच्यासह ग्रामपंचायत सदस्यांनी गटविकास अधिकारी डॉ मुंजुश्री गायकवाड यांना दिलेल्या तक्रार निवेदनात म्हटले आहे की,आमच्या ग्रामपंचायतीच्या ग्रामसेविका प्रियंका अशोक बाविस्कर यांनी ग्रामपंचायतीत एक सुत्री मनमानी कारभार करीत असुन, १५वा वित्त आयोग व ग्रामपंचायतीचे माध्यमातुन होणारी कामे स्वतः करतात संबधीत ग्रामसेविकेचे पती हे त्यांच्या सोबत राहुन ग्रामपंचायतीच्या कामात हस्तक्षेप करून ग्रामपंचायतीची कामे पतीला करायला लावुन ईतरांच्या नांवावर कामांची बिले काढतात ग्रामसेविका प्रियंका बाविस्कर या दबंगीरी दाखवुन खोटे गुन्हे दाखल करण्याची धमकी देवुन त्यांनी सरपंच यांची केईवाय स्वतःकडे ठेवली असुन, ग्रामसेविका या त्याचा गैरवापर करून ई टेन्डर करून पतीच्या माध्यमातुन कामे करतात व झालेल्या कामांना मॅनेज करून ग्रामपंचायतीच्या मासीक ग्रामसभेत मंजुरीसाठी ठेवतात या कामांना ग्रामपंचायत सरपंच आणी उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्यांचे या पदचा गैरवापर करून केलेल्या कामांच्या खर्चास मंजुर करून घेत असतात, यावेळी सरपंच व ग्रामपंचायत सदस्य या संदर्भात जाब विचारण्यास गेल्यास गुन्हे दाखल करण्याची धमकी देतात, अशा प्रकार ग्रामसेविकेच्या दबंगीरीच्या कारभारामुळे गावातील ग्रामस्थ मंडळी ग्रामसभेत याला घाबरतात, ग्रामसेविका प्रियंका बाविस्कर यांनी ग्रामपंचायतचे संपुर्ण दफ्तर स्वतःच्या घरी घेवुन गेल्या असुन, त्यांच्या अशा मनमानी व दबंगगीरीच्या एकतर्फी कारभारामुळे चुंचाळे गावातील ग्रामस्थांना आपल्या हक्काच्या मुलभुत सुविधापासुन वंचित राहावे लागत आहे. तरी अशा मुजोर व मनमानी कारभार करणाऱ्या ग्रामसेविका प्रियंका बाविस्कर यांची तात्काळ चुंचाळे ग्रामपंचायत मधून बदली करावी, अन्यथा यावल पंचायत समितीच्या कार्यालयासमोर आमरण उपोषण करणार असल्याचा इशारा सरपंच नौशाद मुबारक तडवी, उपसरपंच मनोज फकिरा धनगर व ग्राम पंचायत सदस्य सपना दिपक कोळी, सरला सुधाकर कोळी, संजय देविरास पाटील यांनी दिला आहे. दरम्यान पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी व काही भ्रष्ट राजकीय मंडळी यांच्या हस्तक्षेपामुळे प्रथमच तालुक्यात संपुर्ण ग्रामपंचायत व ग्रामस्थ मंडळी ही ग्रामसेवकाच्या भोंगळ कारभारा विरूद्ध तक्रारी होत असतांना देखील अशा भ्रष्ट ग्रामसेविकाची बदली होत नसल्याने प्रशासकीय कारभार संशयात आले असल्याचे चर्चेला जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here