Home नाशिक हरितसेनेला वृक्षारोपणासाठी सर्वतोपरी मदत करू सरपंच जयदत्त होळकर

हरितसेनेला वृक्षारोपणासाठी सर्वतोपरी मदत करू सरपंच जयदत्त होळकर

128
0

आशाताई बच्छाव

IMG-20230617-WA0023.jpg

हरितसेनेला वृक्षारोपणासाठी सर्वतोपरी मदत करू

सरपंच जयदत्त होळकर

दैनिक युवा मराठा
रामभाऊ आवारे निफाड

हरितसेनेने लासलगावमध्ये वृक्षारोपणाचा आणि त्यांच्या संगोपनाचा जो विडा उचलला आहे, त्यासाठी सर्वतोपरी मदत करू!’ असे प्रतिपादन लासलगाव ग्रामपंचायत सरपंच जयदत्त होळकर यांनी केले. हरित सेनेने आयोजित संत ज्ञानेश्वर माऊली मंदिर, बालाजी नगर, कोटमगाव रोड येथे आयोजित केलेल्या वृक्षारोपण कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ते बोलत होते.
हरित सेनेच्या माध्यमातून सातत्याने पर्यावरणाचे हित जपण्यासाठी परिसरात दरवर्षी शक्य तेवढे जास्तीत जास्त वृक्षारोपण करण्यात येते. यंदा तशी चळवळ उभी रहावी आणि सर्वांनी त्यात सहभाग घेऊन लासलगाव हिरवेगार करावे, अशी अपेक्षा संजय बिरार यांनी यावेळी व्यक्त केली.
ब्राह्मण महासंघ विश्वस्त तथा मैत्रेयी महिला मंडळ अध्यक्ष सौ. स्मिताताई कुलकर्णी यांनी गारपीट रोखण्यासाठी वृक्षारोपण अतिशय महत्त्वाचे आहे, असे सांगून भविष्यातील हरित सेनेच्या उपक्रमात ब्राह्मण महासंघ, ब्राह्मण सेवा मंडळ, मैत्रेयी महिला मंडळ, समर्थ युवा संघटनेचा कायम पाठिंबा राहील, असे आश्वासन दिले.यंदा संत ज्ञानेश्वर मंदिर परिसरातुन वृक्षारोपणासाठी सुरूवात केली त्याबद्दल त्यांनी धन्यवाद व्यक्त केले.
या वृक्षारोपण कार्यक्रमात कडूनिंबाची ४, तामण ४, बकुळ ४, कांचन ४, कदंब ४, कैलास्पती ६, बेल ४, रुद्राक्ष १, बुच १ आणि काही फुलझाडांची रोपे लावण्यात आली.
या प्रसंगी लासलगाव ग्रामपंचायत सरपंच जयदत्त होळकर, राजा शिवछत्रपती प्रतिष्ठान चे अध्यक्ष संजय बिरार, हरित सेनेचे निलेश वर्मा, राजेंद्र होळकर, संतोष कुलकर्णी, मयुर देसाई, निलेश जगताप, डॉ. रूपेश गांगुर्डे, शेखर शिंदे, जितेंद्र बिरार, भास्कर गुरू जोशी, नितीन शर्मा, शेखर कुलकर्णी, वसंत दंडवते, राजेंद्र कुलकर्णी, अतिष कुलकर्णी, दिनेश जोशी, गणेश जोशी, सुशील जोशी, ऋषीकेश जोशी, ईश्वर केंगे, सौ.स्मिताताई कुलकर्णी, सौ.रजनी कुलकर्णी, सौ. नेहा शर्मा, सौ. रोहिणी जाधव, सौ.भारती सोनवणे, सौ. कविता बिरार, श्रीमती सरला दिक्षित, सौ स्वाती जोशी, सौ.अक्षदा जोशी, सौ. स्नेहल जोशी, सौ.तृप्ती केंगे, कु.आराध्या जोशी आणि परिसरातील नागरिक उपस्थित होते.

Previous articleचुंचाळे ग्रामपंचायतच्या ग्रामसेवकाची दंबगीरी व मनमानी कारभाराच्या विरुद्ध सरपंच व उपसरपंच यांची गटविकास अधिकारी यांच्याकडे तक्रार.
Next articleसीता आदर्श माता-भाग ३
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here