Home रत्नागिरी वात्सल्यसिंधू सेवाभावी संस्थेच्या शिबिराला प्रतिसाद

वात्सल्यसिंधू सेवाभावी संस्थेच्या शिबिराला प्रतिसाद

42
0

आशाताई बच्छाव

IMG-20220804-WA0024.jpg

वात्सल्यसिंधू सेवाभावी संस्थेच्या शिबिराला प्रतिसाद   रत्नागिरी,(सुनील धावडे ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क)

जनतेला नि:स्वार्थी सेवा देणाऱ्या एसटी महामंडळातील चालक, वाहक, कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबीयांसाठी वात्सल्यसिंधू सेवाभाव संस्थेतर्फे काेविड लसीकरण आणि आराेग्य तपासणी शिबिर आयाेजित करण्यात आले हाेते. या शिबिरात २६० जणांचे लसीकरण आणि ८४ जणांची आराेग्य तपासणी करण्यात आली.

एसटी महामंडळातील चालक, वाहक नेहमीच जनतेला नि:स्वार्थपणे सेवा देण्याचे काम करत असतात. ही सेवा बजावताना त्यांना आराेग्याकडे लक्ष देण्यास पुरेसा वेळ मिळत नाही. त्यांच्या आराेग्याची काळजी घेण्याच्या दृष्टीने रत्नागिरीतील वात्सल्यसिंधू सेवाभावी संस्थेतर्फे माळनाका येथील एसटी आगारात शिबिराचे आयाेजन करण्यात आले हाेते. या शिबिरात काेविडशिल्ड व काेव्हॅक्सीन पहिला, दुसरा आणि बुस्टर डाेस २६० जणांना देण्यात आला. तर प्राईम डायग्नाेसिस सेंटरतर्फे रक्तदाब, मधुमेह यांची तपासणी करण्यात आली.

यावेळी वात्सल्यसिंधू सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष अनिरुद्ध (छोटु) खामकर, एसटी महामंडळाचे विभाग नियंत्रक प्रज्ञेश बाेरसे, कामगार अधिकारी प्रवीण पाटील, आगार व्यवस्थापक रमाकांत शिंदे, वरिष्ठी लिपिक महेंद्र ताेडणकर, कामगार कल्याण निर्देशक प्रसाद माेहिते, प्राईम डायग्नाेसिस सेंटरच्या व्यवस्थापकीय संचालिका डाॅ. तरन्नूम खलिफे, मुख्य कार्यकारी अधिकारी समीक्षा बने उपस्थित हाेत्या.

या शिबिराला संस्थेचे शैलेश मुकादम, दिव्यांशी रसाळ, अरुण आडिवरेकर, सारिका विलणकर, अभिजित विलणकर, अंजली सावंत, राजरत्न प्रतिष्ठानचे अध्यक्ष रुपेश सावंत, संताेष सावंत, सतीश राणे, आर्य राणे, यश डाेंगरे, अमेय सावंत यांच्यासह वैद्यकीय अधिकारी, परिचारिका उपस्थित हाेत्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here