Home रत्नागिरी एक हात समाजकार्याचा” जाणिवेतून चाफे ते गणपतीपुळे रस्त्याची दुरुस्ती ! धामणसे सांबरेवाडी...

एक हात समाजकार्याचा” जाणिवेतून चाफे ते गणपतीपुळे रस्त्याची दुरुस्ती ! धामणसे सांबरेवाडी येथील मनसे युवा कार्यकर्त्यांची उल्लेखनीय कामगिरी

62
0

आशाताई बच्छाव

IMG-20220804-WA0012.jpg

“एक हात समाजकार्याचा” जाणिवेतून चाफे ते गणपतीपुळे रस्त्याची दुरुस्ती ! धामणसे सांबरेवाडी येथील मनसे युवा कार्यकर्त्यांची उल्लेखनीय कामगिरी   रत्नागिरी,(सुनील धावडे ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क)

रत्नागिरी तालुक्यातील चाफे ते गणपतीपुळे या मुख्य मार्गाचे गेल्या काही महिन्यांपूर्वी दुरुस्तीचे काम करण्यात आले. परंतु या मुख्य मार्गावर दुरुस्तीचे काम करताना सांबरेवाडीपासून चाफेकडे जाताना एक किलोमीटर अंतरापासून चाफेपर्यंतच्या रस्त्याचे काम पूर्ण झालेले नाही. मात्र या अपूर्ण राहिलेल्या रस्त्यामध्ये पावसाच्या तडाख्याने मोठ-मोठे खड्डे पडून मोठी दुरावस्था झाली होती. त्यामुळे सर्वच लहान मोठ्या वाहतुकीला मोठा अडथळा निर्माण होत होता. यामुळे विविध ठिकाणाहून ये-जा करणाऱ्या सर्वच लहान मोठ्या वाहनचालकांची मोठ्या प्रमाणात नाराजी व्यक्त होत होती. त्यामुळे याच गोष्टीची दखल घेऊन धामणसे सांबरेवाडी येथील मनसेचे युवा कार्यकर्ते सत्यवान उर्फ पिंट्या सांबरे, समीर भुते, रघुनाथ सांबरे, अथर्व सांबरे, सौरभ सांबरे, रोहन सांबरे, राज सांबरे आदी कार्यकर्त्यांनी “एक हात समाजकार्याचा” या प्रखर जाणिवेतून ररस्त्यावरील खड्डे बुजवण्याची मोठी कामगिरी केली आहे.

यासाठी या सर्व कार्यकर्त्यांनी आपल्याकडील सर्व साहित्य गोळा करून या रस्त्यावर पडलेल्या मोठमोठे खड्डे बुजवण्याचे काम केले. या रस्त्यावरील खड्डे बुजवण्याचे काम केल्यामुळे आता हा रस्ता वाहतुकीला अतिशय सुसज्ज झाला आहे. तसेच नव्याने झालेल्या या दुरुस्तीच्या कामामुळे सर्वच येणाऱ्या-जाणाऱ्या वाहनचालकांना मोठा दिलासा प्राप्त झाला आहे.

चाफे ते गणपतीपुळे हा मुख्य रस्ता पर्यटनाच्या दृष्टीने महत्त्वाचा मार्ग मानला जातो. याच दृष्टीकोनातून या रस्त्याच्या दुरुस्तीचे काम धामणसे सांबरे वाडी येथील मनसेच्या युवा कार्यकर्त्यांकडून हाती घेण्यात आले. सामाजिक कार्याच्या प्रेरणेतून सामाजिक बांधिलकी जपत सांबरेवाडी मनसेच्या युवा कार्यकर्त्यांनी रस्त्याच्या दुरूस्तीचे काम पूर्ण केल्याने त्यांच्या उल्लेखनीय सामाजिक कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे. तसेच चाफे, धामणसे ते गणपतीपुळे- मालगुंड परिसरातील सर्वच लहान मोठ्या वाहनचालकांकडून धामणसे सांबरेवाडी येथील मनसे युवा कार्यकर्त्यांना धन्यवाद देण्यात येत आहेत.

Previous articleघरोघरी तिरंगा अभियानांतर्गत हुतात्मा स्मारक येथे झेंडा विक्री केंद्र जिल्हाधिकारी यांच्या हस्ते उद्घाटन
Next articleवात्सल्यसिंधू सेवाभावी संस्थेच्या शिबिराला प्रतिसाद
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here