Home बुलढाणा घरोघरी तिरंगा अभियानांतर्गत हुतात्मा स्मारक येथे झेंडा विक्री केंद्र जिल्हाधिकारी यांच्या हस्ते...

घरोघरी तिरंगा अभियानांतर्गत हुतात्मा स्मारक येथे झेंडा विक्री केंद्र जिल्हाधिकारी यांच्या हस्ते उद्घाटन

53
0

आशाताई बच्छाव

IMG-20220804-WA0034.jpg

घरोघरी तिरंगा अभियानांतर्गत

हुतात्मा स्मारक येथे झेंडा विक्री केंद्र

जिल्हाधिकारी यांच्या हस्ते उद्घाटन
ब्यूरो चिफ स्वप्निल देशमुख यूवा मराठा न्यूज बूलडाणा
बुलडाणा, दि. 4 : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त घरोघरी तिरंगा अभियान राबविण्यात येत आहे. नागरिकांना तिरंगा ध्वज सहज उपलब्ध व्हावा, यासाठी नगर परिषदेच्या हुतात्मा स्मारकाच्या ठिकाणी तिरंगा ध्वज विक्री केंद्र सुरू करण्यात आले आहे. या केंद्राचे उद्घाटन जिल्हाधिकारी एस. रामामुर्ती यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी अतिरिक्त जिल्हाधिकारी धनंजय गोगटे, निवासी उपजिल्हाधिकारी दिनेश गिते, मुख्याधिकारी गणेश पांडे, उपमुख्याधिकारी दिगंबर साठे आदी उपस्थित होते.

घरोघरी तिरंगा उपक्रमांतर्गत नगर परिषदेचे हुतात्मा स्मारक, बुलडाणा नगर परिषद आणि सोनचिरेया उपजिविका केंद्र, सेंट्रल बँकेच्या बाजुला या तीन ठिकाणी ध्वज विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यात आले आहे.

प्रत्येक नागरिकांच्या मनात देशभावना वृद्धिंगत करण्यासाठी घरोघरी तिरंगा अभियान स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवात राबविण्यात येत आहे. यात नागरिकांनी सक्रीय सहभाग नोंदवावा, यासाठी तिरंगा ध्वज उपलब्ध करून देण्यात येत आहे. नागरिकांनी ध्वज खरेदी करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी एस. रामामुर्ती यांनी यावेळी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here