Home विदर्भ मालेगांव तालुक्यात सोयाबीन पेरणीस व कापूस लागवडीस सुरवात

मालेगांव तालुक्यात सोयाबीन पेरणीस व कापूस लागवडीस सुरवात

107
0

राजेंद्र पाटील राऊत

मालेगांव तालुक्यात सोयाबीन पेरणीस व कापूस लागवडीस सुरवात                                         मालेगांव,(प्रकाश भुरे जैन तालुका प्रतिनिधी विदर्भ) 

मालेगांव तालुक्यात मान्सून चा दमदार पाऊस झाला असून काही भागातील शेतकरी वर्गाने त्यांच्या शेतात कापूस,सोयाबीन,उडीद, मूग पेरणीस सुरुवात केली आहे.या वर्षी पावसाचे आगमन लवकर व दमदार झाले आणि शेतीची मशागतीचे कामे पण आटोपत शेतकरी वर्गाने उत्साने पावसाचे स्वागत केले.कोरोना मुळे काही दिवस असलेला लॉकडाऊन अन् हताश झालेला शेतकरी वर्ग पावसाचे आगमन होताच आंगवरील मरगळ झटकून पुन्हा नव्या जोमाने अन् नव्या उमेदीने कामास लागला.तालुक्यात सोयाबीन चा पेरा खूप मोठ्या प्रमाणावर असतो.आता काही प्रमाणात कापूस लागवड करण्याकडे सुद्धा शेतकरी वर्ग वळला आहे.मागच्या वर्षी ऐन सोयाबीन काढणीच्या वेळी पाऊस आला होता त्यामुळे शेतात उभे सोयाबीन भिजले होते त्याचा दुष्परिणाम म्हणजे या वर्षी सोयाबीन पिकाच्या बियान्याची उगवण क्षमता ही कमकुवत आहे. या दूरदृष्टिकोन लक्षात घेऊन कृषी विभाग मालेगांव यांच्या वतीने गावोगावी जाऊन सोयाबीन बियाण्याची उगवण क्षमता चाचणी व ट्रॅक्टर ड्रायव्हर प्रशिक्षण कार्यक्राअंतर्गत शेतकरी वर्गात जागृती अभियान राबविण्यात आले. सोयाबीन बियाणे घराचे असो किंवा बॅग चे असो पेरणी करण्या पूर्वी तपासा अन् पेरणी पूर्वी बीजप्रक्रिया करून नंतरच पेरा असे आवाहन तालुका कृषि अधिकारी शशिकांत जाभरुंकर यांनी शेतकऱ्याना केले.

Previous articleआता प्रतीक्षा शाळेची घंटा वाजण्याची कोरोना उतरणीला लागल्याने अपेक्षा उंचावल्या
Next articleहिप्परगा माळ येथे वंचित बहुजन आघाडीच्या शाखेचे व तालुका संपर्क कार्यालयाचे उद्घाटन…
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here