Home जळगाव पाटण्यात तीन महिन्यात पूल उभारण्याचे आश्वासन…. भाविकांचे जलसमाधी आंदोलन स्थगित..

पाटण्यात तीन महिन्यात पूल उभारण्याचे आश्वासन…. भाविकांचे जलसमाधी आंदोलन स्थगित..

53
0

आशाताई बच्छाव

IMG-20231011-WA0068.jpg

पाटण्यात तीन महिन्यात पूल उभारण्याचे आश्वासन….

भाविकांचे जलसमाधी आंदोलन स्थगित..

चाळीसगाव प्रतिनिधी विजय पाटील – तालुक्यातील पाटणादेवी येथे चंडिका मातेच्या मंदिराकडे जाणाऱ्या नदीवर पूल नसल्याने भाविकांना अडचणींना समोरे जावे लागते. यंदाच्या नवरात्रोत्स सुरू होण्यापूर्वी या नदीवर पूल न उभारल्यास आज 11 ऑक्टॉबर रोजी जलसमाधी घेण्याचा इशारा भाविकांनी दिला होता.मात्र या पुलासाठी दिल्ली येथून लवकरच परवानगी घेऊन पुलाची निर्मीती करण्याचे सार्वजनिक बांधकाम विभागाला सुचीत केले जाईल. येत्या तीन महिन्यात येथे नवीन पूल उभारला जाईल असे लेखी आश्वासन छत्रपती संभाजी नगर येथील भारतीय पुरातत्त्व विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिल्याने भाविकांनी आंदोलन तुर्त स्थगित केले. मात्र काम जर प्रगतीपथावर दिसले नाही तर पुन्हा आम्ही आंदोलनावर ठाम राहू असा इशाराही भाविकांनी यावेळी दिला. यावेळी चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्टेशनचा तगडा बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
आज सकाळी दिपक पाटील, राकेश निकम, पाटणा सरपंच नितीन पाटील यांच्यासह पाटणा, पिंपरखेड, चितेगाव, वालझिरी, गणेशपूर भागातील 70 ते 80 ग्रामस्थासह भाविक जलसमाधी आंदोलनासाठी नदीपात्रात उतरले. यावेळी ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली तडगा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. पोलीस निरीक्षक जाधव पुरातत्व विभागाचे पत्र गावकरी तसेच भाविकांना दाखवले. तीन महिन्यात मंजुरी मिळवून पुलाचे काम सुरू करू त्यासाठी वेळ द्या असे लेखी पत्र दिल्यानंतर पोलीस अधिकारी व पुरातत्व विभागाच्या अधिकाऱ्यांनी आंदोलक भाविकांसह चर्चा केल्यानंतर भाविकांनी आंदोलन स्थगित केले.

Previous articleदेगलूरचे युवा नेते धनाजी जोशी यांचा वाढदिवस अनेक ठिकाणी साजरा करण्यात आला.
Next articleपाणी सोडण्याच्या कारणातून सरपंचाला शिवीगाळ… दोघांवर अट्रॅसिटी…
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here