• Home
  • 🛑 मंत्री शंकरराव गडाख यांच्या भावाच्या पत्नीचा राहत्या घरात आढळला मृतदेह 🛑

🛑 मंत्री शंकरराव गडाख यांच्या भावाच्या पत्नीचा राहत्या घरात आढळला मृतदेह 🛑

🛑 मंत्री शंकरराव गडाख यांच्या भावाच्या पत्नीचा राहत्या घरात आढळला मृतदेह 🛑
✍️ अहमदनगर 🙁 विजय पवार महाराष्ट्र प्रतिनिधी युवा मराठा न्युज )

अहमदनगर :⭕ ज्येष्ठ नेते यशवंतराव गडाख यांच्या सून आणि जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांचे बंधू प्रशांत गडाख यांच्या पत्नी गौरी प्रशांत गडाख यांचा मृतदेह राहत्या घरी आढळून आला आहे.

गौरी गडाख यांचा मृत्यू नेमका कशामुळे झाला, याबाबतची माहिती अद्याप समोर आलेली नाही.

नगर शहरातील उच्चभ्रू व राजकीय नेत्यांची वसाहत असलेल्या यशवंत कॉलनीमध्ये गौरी गडाख यांचा संशयास्पद मृत्यू झाल्याने सर्वत्र चर्चा सुरू आहे.गौरी गडाख या मृत अवस्थेत आढळल्याची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. याप्रकरणी तोपखना पोलीस ठाण्यात अकास्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

दरम्यान, एका प्रतिष्ठित राजकीय घराण्यातील व्यक्तीचा संशयास्पद मृत्यू झाल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. गौरी गडाख यांचा मृत्यू नेमका कशामुळे झाला, याबाबत पोलीस अधिक तपास करत आहेत…⭕

anews Banner

Leave A Comment