• Home
  • 🛑 निशिकांत कामतचं निधन, ‘लय भारी’ दिग्दर्शक हरपला; रितेशचं भावुक ट्विट 🛑

🛑 निशिकांत कामतचं निधन, ‘लय भारी’ दिग्दर्शक हरपला; रितेशचं भावुक ट्विट 🛑

 

🛑 निशिकांत कामतचं निधन, ‘लय भारी’ दिग्दर्शक हरपला; रितेशचं भावुक ट्विट 🛑

मुंबई ( साईप्रजित मोरे ब्युरो चीफ युवा मराठा न्युज )

मुंबई, 18 ऑगस्ट : ⭕ डोंबिवली फास्ट’, ‘दृश्यम’ फेम दिग्दर्शक निशिकांत कामतच्या निधनाची अफवा सकाळपासून सगळीकडे पसरली होती. त्यानंतर त्याला व्हेंटिलेटर ठेवण्यात आल्याचे रितेश देशमुखने ट्विटरवर सांगितले होते. मात्र आज संध्याकाळी 4 वाजता त्याची प्राणज्योत मालवली.

निशिकांत कामतने वयाच्या 50व्या वर्षी हैदराबाद येथे अखेरचा श्वास घेतला. गेल्या काही दिवसांपासून निशिकांत कामतची प्रकृती बिघडली होती आणि त्याच्यावर हैदराबादमधील रुग्णालयात उपचार सुरु होते. निशिकांत कामतला यकृताशी संबंधित आजारामुळे त्रास होत होता. आज त्याच्या निधनाचे वृत्त सोशल मीडियावर व्हायरल होत होते. मात्र हॉस्पिटलकडून त्याची प्रकृती गंभीर असून त्याला व्हेटिंलेटवर ठेवण्यात आल्याचे सांगण्यात आले होते. आता संध्याकाळी 4 वाजता त्याने अखेरचा श्वास घेतला. त्याच्या निधनामुळे मराठी चित्रपटसृष्टी आणि बॉलिवूडमध्ये शोककळा पसरली आहे.

निशिकांत कामतच्या निधनाच्या वृत्तावर कलाविश्वातील कलाकार सोशल मीडियावर श्रद्धांजली वाहत आहेत. दरम्यान रितेश देशमुखने ट्विटरवर निशिकांत कामतसोबत गळाभेट करतानाचा फोटो शेअर करत ट्विट केले. त्याने म्हटले की, मित्रा तुझी खूप आठवण येईल. तुझ्या आत्म्यास शांती लाभो.

निशिकांत कामतने ‘डोंबिवली फास्ट’ या मराठी चित्रपटाद्वारे दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण केले होते. हा सिनेमा सुपरहिट ठरला. २००६ मधील मुंबई बॉम्बस्फोटावर आधारित हिंदीतील ‘मुंबई मेरी जान’ या चित्रपटाचेही त्याने दिग्दर्शन केले. त्यानंतर निशिकांत कामतने ‘दृश्यम’, ‘मदारी’, ‘फुगे’ यासारख्या चित्रपटांचे सुद्धा दिग्दर्शन केले होते. याशिवाय, ‘सातच्या आत घरात’, ‘रॉकी हॅण्डसम’, ‘जुली 2’, ‘मदारी’, ‘भावेश जोशी’ या सारख्या हिंदी-मराठी चित्रपटात निशिकांत कामतने अभिनय केला.⭕

anews Banner

Leave A Comment