• Home
  • 🛑 लॉकडाऊनची मरगळ झटका; MSME क्षेत्रात ५ कोटी नोकऱ्या उपलब्ध होणार 🛑

🛑 लॉकडाऊनची मरगळ झटका; MSME क्षेत्रात ५ कोटी नोकऱ्या उपलब्ध होणार 🛑

🛑 लॉकडाऊनची मरगळ झटका; MSME क्षेत्रात ५ कोटी नोकऱ्या उपलब्ध होणार 🛑

मुंबई ( साईप्रजित मोरे ब्युरो चीफ युवा मराठा न्युज )

मुंबई, 18 ऑगस्ट : ⭕ कोरोना व्हायरसमुळे देशाचे आर्थिक चक्र ठप्प झालं होतं. लाखो लोक बेरोजगार झाले. हातावर पोट असणाऱ्यांची बचत मागच्या सहा महिन्यात संपली. आर्थिक संकटाचे काळे ढग आणखी गडद झाल्याचे सर्वांना भासू लागले. पुर्ण देश या संकटाचा सामना करत असताना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी एक चांगली बातमी दिली आहे. अर्थव्यवस्था रुळावर आणण्यासाठी केंद्र सरकार विविध उपाययोजना करत आहे. त्याचाच एक भाग म्हणून स्वावलंबन ई-समिट २०२० (Swavalamban e-Summit 2020) या कार्यक्रमातंर्गत देशात ५ कोटी नवीन नोकऱ्या उपलब्ध होती, अशी माहिती गडकरी यांनी दिली आहे.

गडकरी यांनी सांगितले की, “भारतीय अर्थव्यवस्थेला पुन्हा मजबूत करण्यासाठी काम सुरु केले आहे. MSME सेक्टर म्हणजे सूश्म, लघू आणि मध्य उद्योग क्षेत्राचे मोठे योगदान राहिले आहे. जीडीपीमधील ३० टक्के उत्पन्न याच क्षेत्रामधून येत असते. निर्यातीमध्ये देखील या क्षेत्राचा वाटा ४८ टक्के एवढा आहे. आतापर्यंत या क्षेत्रात देशातील ११ कोटी लोकांना रोजगार मिळाला आहे.”

स्वावलंबन ई-समिट २०२० मध्ये नितीन गडकरी यांनी विश्वास व्यक्त केला की, पुढच्या पाच वर्षात MSME क्षेत्राची वाढ होऊन त्याचा वाढीचा दर हा ५० टक्के असेल. तसेच निर्यात वाढविण्यासाठी प्रोत्साहन दिले जाणार असून त्यातून ५ कोटी नवे रोजगार निर्माण होतील. त्यामुळे काही दिवसांनी या क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर नोकऱ्यांची संधी उपलब्ध होईल.

तसेच ज्या उद्योगाची अद्याप नोंदणी झालेली नाही. त्यांनी MSMEs चा फायदा घेण्यासाठी सूक्ष्म उद्योग (Micro Industry) अंतर्गत आपला उद्योगाची नोंदणी करायला हवी. सरकार छोट्या ट्रेडर्सना देखील या योजनेच्या अंतर्गत आणण्याचा प्रयत्न करणार आहे. त्यासाठी बिगर सरकारी संस्थांची मदत घेतली जाणार असल्याचेही गडकरी यांनी सांगितले.⭕

anews Banner

Leave A Comment