• Home
  • 🛑 नवनीत राणा लढल्या आणि जिंकल्या 🛑

🛑 नवनीत राणा लढल्या आणि जिंकल्या 🛑

🛑 नवनीत राणा लढल्या आणि जिंकल्या 🛑

मुंबई ( साईप्रजित मोरे ब्युरो चीफ युवा मराठा न्युज )

मुंबई, 18 ऑगस्ट : ⭕ अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांना कोरोनाची लागण झाली होती. अखेर नवनीत राणा यांनी कोरोनाला मात दिली असून लीलावती हॉस्पिटलमधून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

खासदार नवनीत राणा यांना 6 ऑगस्ट रोजी कोरोनाची लागण झाली होती. त्यांच्यासह त्यांच्या कुटुंबातील 12 सदस्यांना देखील कोरोनाची लागण झाल्याचं स्पष्ट झाले होते. नागपूरमध्ये उपचारादरम्यान नवनीत राणा यांची प्रकृती अचानक खालावली. त्यामुळे 13 ऑगस्ट रोजी नवनीत राणा यांना तातडीने मुंबईतील लीलावती हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले होते.

लीलावती रुग्णालयात दाखल केल्यानंतर त्यांना आयसीयूमध्ये ठेवण्यात आले होते. अखेर, उपचाराअंती त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाली. दोनच दिवसांपूर्वी नवनीत राणा यांनी फेसबुक व्हिडिओ करून आपण बरे झाले असून आयसीयूमधून बाहेर पडलो आहोत, अशी माहिती खुद्द राणा यांनी फेसबुक व्हिडिओ करून दिली.

‘लीलावती रुग्णालयाच्या आयसीयूमधून बाहेर आली आहे. अनेक लोक माझ्यासाठी चिंता करत होते, प्रार्थना करत होते. या प्रार्थनांमुळे मी मरता मरता वाचले. माझी तब्येत आता ठीक आहे. देवाने मला पुन्हा एक संधी दिली पाहिजे, अशी मी प्रार्थना करत होते. कारण मला माझ्या लोकांसाठी काम करायचं आहे. आपल्या आशीर्वादमुळे मी आज वाचले. सगळ्यांचे धन्यवाद,’ असं त्यांनी या व्हिडिओतून म्हटलं होतं.

अखेर नवनीत राणा यांना काल लीलावती रुग्णालयातून घरी जाण्यास डिस्चार्ज देण्यात आला आहे. पण पुढील 15 दिवस आराम करण्याचा डॉक्टरांनी सल्ला दिला आहे.⭕

anews Banner

Leave A Comment