Home भंडारा एकोडी येथे आदिवासी गोवारी समाजाच्या वतीने 114 शहीद बांधवांना श्रद्धांजली

एकोडी येथे आदिवासी गोवारी समाजाच्या वतीने 114 शहीद बांधवांना श्रद्धांजली

179

आशाताई बच्छाव

IMG_20231124_140257.jpg

एकोडी येथे आदिवासी गोवारी समाजाच्या वतीने 114 शहीद बांधवांना श्रद्धांजली

संजीव भांबोरे
भंडारा( जिल्हा प्रतिनिधी) आदिवासी गोवारी समाज संघटनेच्या वतीने 114 शाहिद बांधवांना श्रद्धांजली कार्यक्रम आयोजित करण्यात आले.

कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी ग्रामपंचायत सदस्य भावेश कोटांगले तर प्रमुख अतिथी ग्रामपंचायत सदस्य वैभव खोब्रागडे, सदस्या कुंदाताई जांभूळकर, माजी विस्तार अधिकारी विजय भूरे, कार्तिक मेश्राम, आदिवासी गोवारी समाज संघटनेचे अध्यक्ष मुकेश नेवारे, उपाध्यक्ष क्रीष्णा नेवारे, सचिव नरेश चौधरी, मार्गदर्शक सुभाष चचाने, पद्माक्ष गजबे, दिनेश गुरबेले उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला शाहिद स्तंभाचे पूजन करून 114 शाहिद बांधवांना श्रद्धांजली देण्यात आली.तसेस वैराग्यमूर्ती गाडगेबाबा यांच्या पुतळ्याचे पूजन करून माल्यार्पण करण्यात आले. नंतर उपस्थित वैभव खोब्रागडे, विजय भुरे यांनी आदिवासी शाहीद बांधव यांच्या विषयी मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष भावेश कोटांगले शहीद बांधवांना श्रद्धांजली अर्पण करून विस्तृत अशी माहिती आपल्या मार्गदर्शनातून दिली.
कार्यक्रमाचे संचालन व आभार उपसरपंच रिंगण राऊत यांनी केले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व आदिवासी गोवारी संघटनेचे पदाधिकारी तसेच सर्व समाज बांधव व महिलांनी सहकार्य केले.

Previous articleमनोज जरागे पाटील साठी रक्ताने काढलेली प्रतिमा सुपूर्द
Next articleपंकजा मुंडे यांचे दुर्दैव… त्या शिंकल्या, असल्या तरी बातमी होते. चंद्रकांत पाटलाची खोचक प्रतिक्रिया.
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.