Home अमरावती पंकजा मुंडे यांचे दुर्दैव… त्या शिंकल्या, असल्या तरी बातमी होते. चंद्रकांत पाटलाची...

पंकजा मुंडे यांचे दुर्दैव… त्या शिंकल्या, असल्या तरी बातमी होते. चंद्रकांत पाटलाची खोचक प्रतिक्रिया.

72
0

आशाताई बच्छाव

IMG_20231125_060712.jpg

पंकजा मुंडे यांचे दुर्दैव… त्या शिंकल्या, असल्या तरी बातमी होते. चंद्रकांत पाटलाची खोचक प्रतिक्रिया.
————
दैनिक युवा मराठा
पी एन देशमुख
अमरावती विभागीय संपादक.
अमरावती
भाजपच्या नेत्या तथा माजी मंत्री पंकजा मुंडे यांच्या प्रत्येक वक्तव्याचा वेगळा अर्थ काढला जातो. त्यामुळे त्यांचे खूप नुकसान होत आहे. खरे तर त्या शिंकल्या, हसल्या तरी बातमी होते. हे पंकजा मुंडे यांचे दुर्देवी असल्याची खचक प्रतिक्रिया राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना दिली.ना. चंद्रकांत पाटील हे शुक्रवारी अमरावतीच्या दौऱ्यावर होते शासकीय विश्राम भावना प्रसारमाध्यमाच्या प्रतिनिधीशी त्यांनी वेगवेगळ्या विषयावर संवाद साधला व सदर बाबा प्रसार माध्यमांशी बोलताना दिली. जायकवाडी धरणातून पाणी देणे थांबविले, या प्रश्नावर बोलताना ना. चंद्रकांत पाटील म्हणाले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री तथा जलसंपदा विभागाचे मंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले की मराठवाड्याला त्यांच्या हक्काचे पाणी मिळणारच आहे. यात कोणताही बदल होणार नाही, ही बाब त्यांनी स्पष्ट केली.रासपचे अध्यक्ष तथा माजी मंत्री महादेव जानकर यांनी १४५ आमदार झाले की पंकजा मुंडेंना मुख्यमंत्री करणार, भूमिका जाहीर केल्याबाबत ते म्हणाले महादेव जानकर यांना गोपीनाथ मुंडे यांनी भाजपची जोडले. ते मुंडे कुटुंबाचे सदस्य आहेत त्यामुळे अशा प्रकारची प्रतिक्रिया देने चुकीचं नाही. लोकशाही मध्ये तेवढा आकडा जुडला की, करता येते अशी कुस्ती ना.पाटील यांनी जोडली. मागासवर्गीय आयोग ही स्वायत्त संस्था आहे. मुख्यमंत्रीही त्यांना सूचना करू शकत नाही अंतर्गत तरतूद असलेला हा आयोग आहे त्यावर मी टीपणी करणार नाही. अशी भूमिका चंद्रकांत पाटील यांनी जाहीर केली. संजय राऊत यांना त्यांच्या पक्षातही कोणीही सिरीयस घेत नाही: ना. पाटील असे म्हणाले. शिवसेना (ठाकरे गट) चे नेते संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचे बहुतंशा यांच्या खासदार हे भाजपच्या तिकीटवर निवडणूक लढविणार, वक्तव्य केल्याच्या पार्श्वभूमीवर बोलताना ना. चंद्रकांत पाटील यांनी संजय राऊत यांना त्यांच्या पक्षातही सिरीयस घेत नाही असे म्हणत राऊतची खिल्ली उडवली. तसे तर राज्यात कोणीही संजय राऊत यांना सिरीयस घेत नाही. तुम्ही रोज दाखवता म्हणून ते उत्साहाने काही बोलण्याचा त्यांचा धाडस करतात असे ते म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here