• Home
  • *मराठा समाजाला ओबिसीत समाविष्ट करा,* *संभाजी ब्रिगेड.*

*मराठा समाजाला ओबिसीत समाविष्ट करा,* *संभाजी ब्रिगेड.*

*मराठा समाजाला ओबिसीत समाविष्ट करा,*
*संभाजी ब्रिगेड.*

*कोल्हापूर (मोहन शिंदे ब्युरोचिफ युवा मराठा न्युज)*

मराठा समाजाचा सरसकट ओबिसी मध्ये समावेश करण्यात यावा
अशी मागणी संभाजी ब्रिगेडने
केली आहे.
“न्यायमूर्ती गायकवाड आयोगाने राज्यघटनेच्या ३४० कलमानुसार मराठा समाजाला ओबीसीसाठी पात्र ठरवले होते. आमचीही १९९१ पासून हीच मागणी आहे, त्यामुळे मराठा समाजाचा सरसकट ओबीसीत समावेश करावा,” अशी मागणी संभाजी ब्रिगेडने केली आहे.
मराठा आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाने तात्पुरती स्थगिती दिल्यानंतर मराठा समाजाकडून तीव्र प्रतिक्रिया व्यक्त करण्यात येत आहे. या प्रकरणी मराठा समाजाने
पुन्हा आंदोलन करण्याचा इशारा
दिला आहे.
सदर मागणीचं निवेदन संभाजी ब्रिगेडने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांना पाठवलं आहे. त्याचप्रमाणे हे निवेदन सर्व जिल्हाधिकारी आणि तहसीलदार यांनाही देणार असल्याची माहिती संभाजी ब्रिगेडचे प्रवक्ते डॉ. शिवानंद भानुसे यांनी दिली.

anews Banner

Leave A Comment